एक्स्प्लोर
राम मंदिर ट्रस्टची आज पहिली बैठक, मंदिराच्या भूमीपूजनासह अनेक मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित
राम मंदिर निर्मितीसाठी ट्रस्टची पहिली बैठक संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. या बैठकीत राम मंदिर बांधण्याच्या पुढील काही दिवसांचा अजेंडादेखील निश्चित करण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टची पहिली बैठक आज दिल्लीत शिवजयंतीच्या मुहूर्तावर होणार आहे. ट्रस्टच्या अधिकृत पत्त्यावर R-20, ग्रेटर कैलाश पार्ट 1 येथे ही बैठक पार पडणार आहे. हे हिंदू पक्षकारांचे वकील परासरन यांचं घर आहे.
राम मंदिर ट्रस्टचे वरिष्ठ सदस्य आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू वासुदेवानंद सरस्वती म्हणाले, 2 एप्रिलला रामनवमी आहे. 6 एप्रिलला महावीर जयंती आणि हनुमान जयंती आहे. या दोन्ही दिवशी जर शुभ मुहूर्त नाही मिळाला तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर राम मंदिर बांधण्याची सुरूवात होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सर्वानुमते राम मंदिर बांधण्याची तारीख निश्चित होणार आहे.
राम मंदिर निर्मितीसाठी ट्रस्टची पहिली बैठक संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. या बैठकीसाठी अयोध्याहून रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास विशेषत: दिल्लीत येत आहेत. गोपाल दास ट्रस्टचे सदस्य नाही. परंतु आजच्या विश्वस्त बैठकीत त्यांना सदस्य म्हणून निवडण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीत राम मंदिर आंदोलनासाठी रामजन्मभूमी न्यासाचे भविष्य काय असेल? हे देखील ठरविले जाईल. रामजन्मभूमी न्यास आज बरखास्त करण्याची शक्यता आहे किंवा रामजन्मभूमी न्यासला सरकारतर्फे बनविण्यात आलेल्या राम जन्म तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये समावेश करण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचा निर्णय बहुमताच्या आधारावर घेण्यात येईल. तसेच सदस्याची निवडणूक देखील बहुमताच्या आधारावर घेण्यात येईल.
MNS MahaMorcha | दादरमधील राम मंदिरात मनसैनिकांची महाआरती | ABP Majha
ट्रस्टच्या बैठकीपूर्वी विश्व हिंदू परिषद कार्यालयात ट्रस्टचे सर्व सदस्य सभेसाठी जमणार आहे. यानंतर हे लोक थेट संध्याकाळी पाच वाजता रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या कार्यालयात पोहोचतील आणि तेथील पहिल्या सभेत भाग घेतील. पुन्हा राम मंदिर बांधण्यासाठी पायाभरणीची गरज नाही. एबीपी न्यूजशी खास बातचीत करताना ज्योतिष पीठचे शंकराचार्य आणि रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य वासुदेवानंद सरस्वती यांनी हे सांगितले.
शंकराचार्य जगद्गुरू वासुदेवानंद सरस्वती म्हणाले, 'मंदिराच्या बांधकामासाठी पायाभरणी आधीच झाली आहे आणि पायाभरणी करणारे महेंद्र चौपाल हेदेखील या ट्रस्टचे सदस्य आहेत. वेगळा पाया घालण्याची गरज नाही. परंतु त्या जागेची पूजा केली जाऊ शकते. वासुदेवानंद सरस्वती पुढे म्हणाले की, मंदिराचे बांधकाम लवकरच सुरू झाले पाहिजे. मंदिराची पहिली वीट दलित, महात्मा, शेतकरी किंवा राजकीय नेत्यांच्या हस्ते रचण्याची शक्यता आहे. थोडक्यात या बैठकीत राम मंदिर बांधण्याच्या पुढील काही दिवसांचा अजेंडादेखील निश्चित केला जाणार आहे.
संबंधित बातम्या :
अयोध्येला नक्की जा म्हणजे तुमचं खरं रक्त जागं होईल; फडणवीसांचा शिवसेनाला टोला
राममंदिरासाठी 15 सदस्यीय ट्रस्ट स्थापन, पुण्यातल्या 'या' महाराजांचाही समावेश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement