एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Poll of Polls)
राममंदिरासाठी 15 सदस्यीय ट्रस्ट स्थापन, पुण्यातल्या 'या' महाराजांचाही समावेश
राम मंदिराच्या निर्मितीसाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी जाहीर केलाय. या 15 सदस्यीय ट्रस्टमध्ये महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीचा समावेश आहे..पुण्यातल्या स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांचा ट्रस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : अयोध्यामध्ये राम मंदिर बनवण्यासाठी केंद्र सरकारने आज एक ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत घोषणा देखील केली. यावर लगेच कार्यवाही करत ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून यातील 15 लोकांची नावं घोषित करण्यात आली आहेत. यात महाराष्ट्रातून पुण्यातील स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांची या ट्रस्टमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने 9 फेब्रुवारी पर्यंत ट्रस्ट बनवण्याचे आदेश दिले होते.
ट्रस्टमध्ये या 15 जणांचा समावेश
1. के परासरन (सुप्रीम कोर्टातील वकील)
2. शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वतीजी (प्रयागराज)
3. जगतगुरु मधवाचार्य स्वामी (कर्नाटकमधील पेजावर मठाचे पीठाधीश्वर)
4. युगपुरुष परमानंदजी महाराज (अखंड आश्रम प्रमुख, हरिद्वार)
5. स्वामी गोविंद देव गिरी (प्रवचनकर्ता)
6. विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र (अयोध्या राजपरिवाराचे वंशज)
7. डॉ. अनिल मिश्र (होमिओपॅथिक डॉक्टर)
8. कामेश्वर चौपाल (पटना)
9. महंत दिनेंद्र दास (निर्मोही आखाडा , अयोध्या)
10. बोर्ड ऑफ ट्रस्टी द्वारा नियुक्त सदस्य
11. बोर्ड ऑफ ट्रस्टी द्वारा नियुक्त सदस्य
12. केंद्राचा प्रतिनिधी
13. राज्याचा प्रतिनिधी
14. अयोध्येचे जिल्हाधिकारी
15. ट्रस्टी द्वारा नियुक्त अध्यक्ष
के परासरन यांचं घर ट्रस्टचा पत्ता
सरकारने राममंदिरासाठी ज्या ट्रस्टची निर्मिती केली आहे. त्या ट्रस्टचा पत्ता के परासरन यांचं घर असणार आहे. राममंदिर प्रकरणात अनेक वर्षांपासून सुप्रीम कोर्टात केस लढणाऱ्या के परासरन यांचा पत्ता R-20 ग्रेटर कैलाश पार्ट वन, नवी दिल्ली असा आहे. हे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लोकसभेत मोठी घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीराम जन्मभूमीबाबत लोकसभेत मोठी घोषणा केली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत बोलत होते. या बैठकीत राम मंदिर ट्रस्ट स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 'श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र' या नावाची ट्रस्ट स्थापन करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 9 फेब्रुवारीपर्यंत ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीला 67.7 एकर हस्तांतरित करण्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राम मंदिराबाबत एक योजना तयार करण्यात आली आहे. राम मंदिर देशातील कोट्यावधी लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. राम जन्मभूमीच्या आणि राम मंदिर निर्मितीच्या विषयावर मी बोलत आहे, हे मी माझं भाग्य समजतो. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीला 67.7 एकर हस्तांतरित करण्यात येणार आहे. तर 5 एकर जमीन सुन्नी वक्फ बोर्डालाही देण्यात येणार असून उत्तर प्रदेश सरकारने याला मंजुरी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
पुढे मोदी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालायने राम मंदिराच्या बाजूने निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डाला पाच एकर जमीन देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसे निर्णय घेण्यात आले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट राम मंदिर उभारणी संदर्भातील निर्णय घेईल. राम जन्मभूमीवर येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेत 67.7 एकर जमीन राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राला हस्तांतरित केली जाणार आहे.
संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement