एक्स्प्लोर

अयोध्येला नक्की जा म्हणजे तुमचं खरं रक्त जागं होईल; फडणवीसांचा शिवसेनाला टोला

नवी मुंबईत भाजपचे अधिवेशन सुरू आहे. यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून महाविकासआघाडी सरकारवर टीका केली. काही लोक आता अयोध्येत जाण्याची भाषा करत आहे. त्यांनी अयोध्येत नक्की जावं म्हणजे त्यांचं खरं रक्त जागं होईल, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला.

नवी मुंबई : अयोध्येला नक्की जा म्हणजे तुमचं खरं रक्त जागं होईल, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचं निर्माण होणार आहे. यावरुन आता काहीजण अयोध्येला जाण्याची भाषा करत आहे. माझं म्हणणं आहे, की त्यांनी अयोध्येला नक्की जावं जेणेकरुन त्यांचं खरं हिंदुत्वाचं रक्त जागं होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी जो हिंदुत्वाचा विचार दिलाय. हा विचार शिवसेना विसरली असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले. नवी मुंबईत महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून दोन दिवसीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अधिवेशनाचं उद्घाटन केलं. या राज्यव्यापी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने जनतेला 80 दिवसांत कसं मूर्ख बनवलं यावर प्रस्ताव सादर केला जाणार आहे. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडीवर जोरदार टीका केली. भाजप राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांच्यासह पक्षाचे विविध नेते या अधिवेशनाला उपस्थित होते. देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे - गेल्या 70 वर्षांपासून प्रलंबित 370 चा प्रश्न पंतप्रधान मोदी सरकारने मार्गी लावला. काही लोक जाणून बुजून एनआरसी आणि सीएए कायद्याबाबत संभ्रम पसरवला जातोय. काश्मीरमध्ये रक्ताचे पाट, नाही तर नवी पहाट उगवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहणार आहे. काही लोक आता अयोध्येला जाण्याची भाषा करत आहे, माझं म्हणणं आहे, की त्यांनी नक्की जावं म्हणजे तुमचं खरं रक्त जागं होईल बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला हिंदुत्वाचा विचार देशाला दिला. अयोध्येतील राम मंदिरासाठी हजारो कारसेवकांनी बलिदान दिलं. यापुढे भाजप स्वबळावर सत्ता परत आणेल आम्हाला सरकार पडण्याची गरज नाही. तुमच्यात हिम्मत असेल तर जनादेशासाठी निवडणूक लावून दाखवा, असेल हिम्मत तर या एकत्र अंगावर, आम्ही एकटे असलो तरी तुम्हाला पुरून उरु. हिम्मत असेल तर सावरकरांची बदनामी करणाऱ्या 'शिदोरी' मासिकावर बंदी घालून दाखवा नाहीतर सत्तेसाठी लाचार असल्याचं कबूल करा. फडणवीस ऑन शरद पवार SIT चौकशी मागणी : भीमा कोरेगाव नंतर अर्बन माओवादी समोर आला. मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घेऊन या प्रकरणाचा चौकशी NIA कडे सोपवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. चौकशीतून सत्य बाहेर येईल याची शरद पवारांना भीती. मतांच्या लांगुलचालनासाठी पवारांना SIT स्थापन करायची होती. पण सत्य लपून राहणार नाही. कितीही देशविरोधींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्यांना सोडणार नाही. धुळे जिल्हा परिषद मध्ये आपण तिन्ही पक्षांना हरवले. आता महापालिका निवडणूक येत आहे. नवी मुंबईपासून आता नवी सुरुवात होणार आहे. आपल्या विजयाची सुरुवात याच नव्या मुंबईपसून करणार आहोत. नवी मुंबई आणि औरंगाबाद मध्ये महापौर भाजपचा असेल. मला हेच बघायचं आहे की कोणते तोंड घेऊन औरंगाबादमध्ये शिवसेना म्हाआघाडी तयार करणार आहेत ते. Navi Mumbai | भाजपचं राज्य अधिवेशन नवी मुंबईत, राज्यभरातून 10 हजार कार्यकर्त्यांची हजेरी | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Praful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावाTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PMRavindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Embed widget