CCTV | दिल्लीत हत्येच्या प्रयत्नाचा थरार सीसीटीव्हीत कैद, तरुणावर तब्बल 17 गोळ्या झाडल्या
मनीषवर 17 गोळ्या झाडण्यात आल्या, त्यातील चार गोळ्या त्याला लागल्या आहेत. हल्ल्यानंतर युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील रोहिणी परिसरात युवकाच्या हत्येच्या प्रयत्नाचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. रोहिणी सेक्टर 11 मध्ये शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. सिनेमातील कथेप्रमाणे युवकाचा पाठलाग करुन त्याच्यावर गोळीबार करुन त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला .
मनीष असं हल्ला झालेल्या युवकाचं नाव आहे. मनीषवर 17 गोळ्या झाडण्यात आल्या, त्यातील चार गोळ्या त्याला लागल्या आहेत. हल्ल्यानंतर युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीष स्विफ्ट कारने जात असताना मागून येणाऱ्या गाडीने ओव्हरटेक करुन त्याला थांबवलं. त्यानंतर गाडीतील हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. आपला जीव वाचवण्यासाठी मनीषने गाडीतून उतरुन पळ काढला. मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत त्याच्यावर गोळीबार केला. एखाद्या सिनेमातील दृष्याप्रमाणे हा सगळा घटनाक्रम होता.
मनीषवर झालेला हल्ला जवळील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मनीष जमिनीवर पडल्यानंतर एका हल्लोखोराने त्याच्यावर गोळ्या झाडल्याचं कॅमेऱ्यात दिसत आहे. या हल्ल्यात मनीष गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.