एक्स्प्लोर
दारु पिऊन वरातीत नाचणाऱ्या वऱ्हाडींचा नवरदेवावरच गोळीबार
उत्तर प्रदेशातल्या खिरी जिल्ह्यातील नीमगावातली ही घटना आहे. यातली एक गोळी नवरदेवाच्या छातीत लागली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला

प्रातिनिधिक फोटो
लखनौ : लग्नाच्या वरातीत दारु पिऊन नाचणाऱ्या वऱ्हाडींनी नवरदेवावरच बेछूट गोळीबार केला. उत्तर प्रदेशातल्या खिरी जिल्ह्यातील नीमगावातली ही घटना आहे.
यातली एक गोळी नवरदेवाच्या छातीत लागली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर वऱ्हांडींनी घटनास्थळाहून पळ काढला.
नीमगावात सीतापूर जिल्ह्यातल्या हाजीपूर गावातील वऱ्हाड आलं होतं. नवरदेवासोबत अनेक मित्रही होते. नवरदेवाच्या मित्रांच्या नाच-गाण्यामुळे लग्नाला उशीर झाला. रात्री एक वाजता जेव्हा वरात पुढे जात होती, तेव्हा काही जणांनी गोळीबार केला.
मुलीकडच्यांनी नवरदेवाला उचलून लग्नस्थळी आणलं. मात्र तिथेही नवरदेवाच्या मित्रांनी गोंधळ घातला. बंदुकीत गोळ्या भरताना त्यातली एक गोळी नवरदेवाला लागली, ज्यात त्याचा मृत्यू झाला.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement



















