एक्स्प्लोर
सामान्यज्ञानाचीही बोंब, बिहारच्या कथित टॉपर्सवर गुन्हा
पाटणा : बिहारमधल्या बारावी परीक्षेतील कथित घोटाळ्यात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सामान्यज्ञानाचे वाभाडे निघाल्याने त्यांच्या गुणांवर संशय व्यक्त करण्यात आला होता.
विज्ञान शाखेतून सौरभ श्रेष्ठ आणि राहुल तर कला शाखेतून रुबी ही विद्यार्थिनी पहिली आली होती. पण त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत या सर्व विद्यार्थ्यांनी सोप्या सोप्या प्रश्नांची काही भलतीच उत्तरं दिली होती.
पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय, होमसायन्समध्ये काय असतं, अशा साध्या प्रश्नांवर तिने जेवण बनवायला शिकवतात, असं उत्तर दिलं. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेत पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांची ही गत पाहून प्रसारमाध्यमांनाही याची चांगलीच दखल घेतली.
पाहा व्हिड़िओ :
अखेर या घोटाळ्यात बिहार शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसह व्ही.आर. महाविद्यालयाच्या संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
बिहारचा कथित टॉपर सौरभ श्रेष्ठ
दरम्यान पुनर्परीक्षा झाल्यास आपण आत्महत्या करु, अशी धमकी सौरभ श्रेष्ठने दिली होती. गणितातले काही मूलभूत प्रश्न विचारल्यानंतर सौरभने पॅनलला हा इशारा दिला, त्यामुळे त्याची पुनर्परीक्षा तात्काळ थांबवण्यात आली. तर पहिल्यांदाच कॅमेरासमोर येणारी पोरं बावचळतात, असा बचावात्मक पवित्रा रुबीच्या आजोबांनी घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement