एक्स्प्लोर
Advertisement
यमुनेत अर्पण वस्तूंसाठी स्थानिक आणि पुजाऱ्यांमध्ये हाणामारी
श्रीकृष्णाचे जन्मस्थान मथुरेत आज पुजारी आणि स्थानिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. विशेष म्हणजे, या हाणामारीचं कारण होतं, ते म्हणजे यमुना नदीत अर्पण केलेल्या वस्तूंवर हक्क कुणाचा? यावरुन.
मथुरा : मकर संक्रातीचा सण संपूर्ण उत्तर प्रदेशासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पण श्रीकृष्णाचे जन्मस्थान मथुरेत आज पुजारी आणि स्थानिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. विशेष म्हणजे, या हाणामारीचं कारण होतं, ते म्हणजे यमुना नदीत अर्पण केलेल्या वस्तूंवर हक्क कुणाचा? यावरुन.
मकर संक्रातीनिमित्त मथुरेत श्रीकृष्ण दर्शनासाठी मोठी गर्दी होते. यानिमित्त इथं आलेले अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने अनेक वस्तू, पूजेचं साहित्य यमुनेत अर्पण करतात.
पण अर्पण केलेल्या वस्तूंवर हक्क कुणाचा यावरुन स्थानिक आणि पुजाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामुळे पुजाऱ्यांच्या या कृतीवरुन प्रश्न उपस्थित होत आहेत.
या हाणामारीनंतर परिसरात एकच गोंधळ उडला. यात चेंगराचेंगरी होत असल्याने, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनाही काही काळ सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
दरम्यान, पुजारी आणि स्थानिकांच्या मारहाणीच्या घटना यापूर्वी देखील झाल्या आहेत. पूजेच्या नावावर इथले पुजारी मनमानी करत, भक्तांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करतात, असा स्थानिकांचा आरोप आहे.
विशेष म्हणजे, याला कुणीही विरोध केला, तर पुजारी मारझोडीवर उतरतात असाही आरोप स्थानिकांकडून केला जातो.
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement