एक्स्प्लोर

Farmers Tractor Rally | ट्रॅक्टर रॅलीत शेतकरी-पोलिसांत संघर्ष, बॅरिकेट्स तोडून शेतकरी दिल्ली हद्दीवर दाखल

Farmers Tractor Rally : शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात झाल्यानंतर दिल्लीच्या दिशेने निघालेल्या हजारो शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्टस तोडले. बॅरिकेट्स तोडून शेतकरी दिल्ली हद्दीवर दाखल झाले आहेत.

Farmers Tractor Rally : कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. जवळपास गेल्या 60 दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढून आपलं आंदोलन सुरु ठेवलं आहे. सिंघू बॉर्डर आणि धंसा बॉर्डरहून ट्रॅक्टर परेडला सुरुवात झाली आहे. परंतु, यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचं दिसून आलं असून काही शेतकरी आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे.

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात झाल्यानंतर दिल्लीच्या दिशेने निघालेल्या हजारो शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्टस तोडले. बॅरिकेट्स तोडून शेतकरी दिल्ली हद्दीवर दाखल झाले आहेत. राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी देण्यात आली होती. परंतु, शेतकऱ्यांनी काही वेळ आधीच आपल्या ट्रॅक्टर परेडला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं.

Farmers Tractor Rally | ट्रॅक्टर रॅलीत शेतकरी-पोलिसांत संघर्ष, बॅरिकेट्स तोडून शेतकरी दिल्ली हद्दीवर दाखल

दिल्ली-हरियाणाच्या टिकरी बॉर्डरवर शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी सुरक्षेसाठी उभारलेले बॅरिकेट्स शेतकऱ्यांनी तोडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे शेतकरी पंजाबमधील किसान मजदूर संघर्ष समितीचे असल्याची माहिती मिळत आहे. संयुक्त किसान मोर्चाने अद्याप मोर्चासाठी सुरुवात केलेली नाही. दरम्यान टिकरी बॉर्डरवर शेतकरी नेत्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. पोलिसांसोबत बैठक घेऊन आंदोलनाची वेळ ठरवली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ : दिल्लीत कृषी कायद्याविरोधात 'ट्रॅक्टर परेड'

दरम्यान, शेतकरी नेत्यांनी आज सकाळी 10 वाजता नऊ ठिकाणी ट्रॅक्टर परेड सुरु करण्याची घोषणा केली होती. ढांसा, चिल्ला, शाहजहांपूर , मसानी बराज, पलवल आणि सुनेढा बॉर्डरवरही ट्रॅक्टर परेड सुरु करण्याची घोषणा केली होती. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget