एक्स्प्लोर
मायावतींवर शेरेबाजी करणाऱ्या दयाशंकर सिंह यांना अटक
पाटणा : बसप अध्यक्षा मायावती यांच्यावर अश्लील शेरेबाजी करणारे भाजपचे माजी नेते दयाशंकर सिंह यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी बिहार पोलिसांच्या मदतीने बिहारमध्ये दयाशंकर यांना बेड्या ठोकल्या आहेत.
बक्सरमधल्या शुगर मिल कॉलनीमध्ये सिंग यांना अटक करण्यात आली. दयाशंकर सिंग यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर ते परागंदा झाले होते. त्यानंतर झारखंडमधील प्रसिद्ध शिव मंदिरात ते पूजा करताना दिसले होते.
मायावती यांच्यावर अश्लील शेरेबाजी केल्यानंतर भाजपने त्यांना पक्षाच्या उत्तर प्रदेशच्या उपाध्यक्षपदावरुन हटवलं होतं. सिंग बालपणी बक्सरमध्ये राहायचे, तर त्यांचं शिक्षण उत्तर प्रदेशात झालं होतं.
दयाशंकर सिंह यांनी मायावतींवर गंभीर आरोप केले होते. मायावती यांनी काशीराम यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केलीय. मायावती पैसे देऊन तिकीटाची विक्री करतात. असं म्हणत दयाशंकर यांनी असंसदीय शब्दात टीका केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement