एक्स्प्लोर
Advertisement
ईव्हीएम घोळ, कोणतंही बटण दाबल्यानंतर भाजपलाच मतदान?
नवी दिल्ली : मध्य प्रदेशमधील दोन जिल्ह्यातील विधानसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी 9 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. मात्र, निवडणुकपूर्व तयारी वेळी ईव्हीएम मशिनमधील घोळ झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल आहे. ईव्हीएम मशिनचा डेमो सादर करताना कोणतंही बटण दाबल्यानंतर भाजपलाच मतदान होत असल्याचं या व्हिडिओमधून समोर आलं आहे. यामुळे काँग्रेस आणि आम आदमी पक्षानं आक्रमक भूमिका घेत, ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेनं मतदान घेण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे.
मध्यप्रदेशच्या भिंड आणि उमरिया जिल्ह्यातील रिक्त झालेल्या दोन जागांसाठी 9 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदानाची तयारी सुरु असून, यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून भिंडमध्ये डेमो दाखवण्यात येत होता. मात्र, यावेळी VVPAT मशिन मध्ये घोळ झाल्याचं समोर आलं आहे. या मशिमधील कोणतंही बटण दाबल्यानंतर भाजपलाच मतदान होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
EVM मशिन घोळचा व्हायरल व्हिडिओ
VVPAT मशिनमधून मिळणाऱ्या स्लिपवर मतदारांनी कोणाला मतदान केलं, हे समजतं. मात्र, या स्लिपनुसार कुठलंही बटण दाबल्यानंतर मतदान भाजपलाच होत असल्याचं व्हिडिओमधून दिसत आहे.
यावरुन आता काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस महासचिव दिग्विजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळाने शनिवारी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त नसीन जैदी यांची भेट घेतली, आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
तसेच यानंतर आगामी विधानसभा निवडणुका या ईव्हीएम मशिन ऐवजी मतपत्रिकेनं घेण्याची मागणी दिग्विजय सिंह यांनी केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच आगामी दिल्ली महानगर पालिकांच्या निवडणुकीतही ईव्हीएम मशिनचा वापर करण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणाची निवडणूक आयोगानेही गंभीर दखल घेतली असून, मुख्य निवडणूक आयोगाने यावरील सविस्तर अहवाल मागवला आहे. तसेच या पोटनिवडणुकीसाठी विशेष पथक पाठवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
बातम्या
विश्व
Advertisement