एक्स्प्लोर
कर्नाटकात राहायचं असेल तर कन्नड भाषा यायलाच पाहिजे : सिद्धरामय्या
“कर्नाटकात राहायचं असेल, तर कन्नड भाषा यायलाच पाहिजे,” असं वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरुमध्ये केलं. कर्नाटकच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
बंगळुरु : “कर्नाटकात राहायचं असेल, तर कन्नड भाषा यायलाच पाहिजे,” असं वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरुमध्ये केलं. कर्नाटकच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
ते म्हणाले की, “कोणतीही नवी भाषा शिकण्याच्या आपण विरोधात नाही.” पण जर कर्नाटकात राहून, कन्नड शिकली नाही, तर ते कानडी भाषेचा अपमान करत आहेत.” तसेच यावेळी त्यांनी राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये कन्नड शिकवलंच पाहिजे, अशीही सूचना केली.
यावेळी सिद्धरामय्या यांनी राज्याच्या स्वतंत्र्य झेंड्याचाही पुनरुच्चार केला. राज्याच्या स्वतंत्र झेंड्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, जी समिती सद्या अस्तित्वात असलेला झेंडा कायम ठेवावा की, त्यात काही बदल करण्याची अवश्यक्ता आहे. यावर निर्णय घेईल.”
सध्या कर्नाटकात पिवळ्या आणि लाल झेंड्यालाच राज्याचा अधिकृत झेंडा म्हणून मान्यता आहे.
कर्नाटकात दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी कन्नड राजोत्सव साजरा केला जातो. 1956 मध्ये दक्षिण भारतात कानडी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement