एक्स्प्लोर

Provident Fund : खुशखबर! पाच कोटी लोकांच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा चेक करा तुमचा बॅलेन्स

EPFO : ईएफपीओने पाच कोटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम वर्ग केली आहे. आपल्या खात्यावर ही रक्कम जमा झाली का ते मोबाईलच्या माध्यमातून चेक करता येईल.

नवी दिल्ली : नोकरी करणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी एक खुशखबर आहे. ईएफपीओने (EPFO) नोकरदारांच्या खात्यात व्याजाची रक्कम वर्ग केली आहे. ईएफपीओने ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारने या वर्षी पीएफ व्याजाची रक्कम ही 8.50 टक्के इतकी निर्धारित केली आहे. 

असं चेक करा तुमचे खाते
आपल्या खात्यावर पैसे जमा झालेत का नाही हे मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या चेक करता येते. ईएफपीओकडून बॅलेन्स चेक करण्यासाठी अनेक पर्याय दिले आहेत. त्या माध्यमातून तुम्ही एसएमएस, मिस्ड कॉल, ऑफिशिअल वेबसाईट आणि उमंग अॅपच्या माध्यमातून बॅलेन्स चेक करु शकता. 

मोबाईलच्या SMS माध्यमातून चेक करा
जर तुम्ही ही रक्कम मोबाईल एसएमएसच्या माध्यमातून चेक करणार असाल तर 7738299899 या नंबरवर EPFOHO UAN ENG असं टाईप करा आणि सेंड करा. यातील शेवटचे तीन अक्षर हे भाषेप्रमाणे टाईप करा आणि सेंड करा. त्यासाठी यूएएन वर रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवरुन हा एसएमएस करावा लागणार आहे. ही सुविधा मराठी भाषेतही उपलब्ध आहे. 

मिस्ड कॉलच्या माध्यमातून चेक करा
ईएफपीओवर रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवरून 011-22901406 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बॅलेन्सचा मेसेज येईल. 

या व्यतिरिक्त Umang अॅप आणि ईएफपीओच्या ऑफिशिअर वेवसाईटवरही ही माहिती मिळू शकेल. 

गेल्या आर्थिक वर्षातील पीएफ (Provident Fund) वर 8.5 टक्के व्याज दर देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय कामगार मंत्री अध्यक्ष असेलेल्या बोर्डने हा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाचा फायदा पाच कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे. 

EPFO ने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हा व्याजदर गेल्या सात वर्षांतील सर्वात कमी आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी व्याज दर समान होता. 2019 मध्ये 8.65 टक्के व्याज ईपीएफवर मिळत होतं. त्याचप्रमाणे पूर्वी 2018 मध्ये 8.55 टक्के व्याज देण्यात आलं होतं. यानुसार मागील आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये, केवायसीमध्ये अडथळा आल्यामुळे, अनेक लोकांना व्याज मिळवण्यासाठी 8-10 महिन्यांची दीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती.

पीएफ म्हणजे काय?
तुम्ही ज्या संस्थेत काम करता त्या संस्थेच्या वतीने दरमहा EPFO खात्यात पैसे हस्तांतरित केले जातात. ही एक निश्चित रक्कम असते, जी तुमच्या पगारातून कापली जाते आणि पीएफ खात्यात जमा केली जाते. तुमची संस्था देखील या खात्यात समान रक्कम योगदान देते त्याला पीएफ म्हटलं जातं.

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVEMaha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget