EPFO : सावधान! 'हा' नंबर शेअर करु नका अन्यथा तुमच्या PF अकाऊंटवरचे सर्व पैसे होतील गायब
EPFO : जर तुमचे पीएफ अकाऊंट (PF Account) असेल तर कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करु नका अन्यथा तुमच्या अकाऊंटवरचे सर्व पैसे गायब होतील असा इशारा देण्यात आला आहे.
EPFO Alert : EPFO खातेधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. जर आपले PF Account असेल तर त्या संबंधी कोणतीही महत्वाची माहिती कुणाशीही शेअर करु नका असं आवाहन EPFO च्या वतीनं करण्यात आलं आहे. एखादी महत्वाची माहिती, किंवा आधार नंबर, पॅन नंबर, यूएन अकाऊंट डिटेल्स, ओटीपी अशी कोणी मागणी केल्यास ती देऊ नये अन्यथा तुमच्या अकाऊंटमधील सर्व पैसे गायब होण्याची शक्यता आहे असं EPFO ने म्हटलं आहे.
EPFO त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डलवर या संबंधी एका ट्वीटच्या माध्यमातून आवाहन केलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, आधार नंबर, पॅन नंबर, बँक डिटेल्स, बँक अकाऊंट डीटेल्स आणि ओटीपी या संबंधी माहिती EPFO कडून कधीही मागण्यात येत नाही. तशा प्रकारचा कोणताही कॉल केला जात नाही. जर अशा प्रकारचा कोणताही कॉल आला तर सावध रहावं आणि कोणतीही डीटेल्स शेअर करु नये.
#EPFO never asks its members to share their personal details like Aadhaar, PAN, UAN, Bank Account or OTP over phone or on social media.#SocialSecurity #ईपीएफ@byadavbjp @Rameswar_Teli @PMOIndia @PIB_India @PIBHindi @MIB_India @DDNewslive @airnewsalerts @mygovindia @PTI_News pic.twitter.com/kG6UQ5O3mb
— EPFO (@socialepfo) October 23, 2021
तुम्ही ज्या संस्थेत काम करता त्या संस्थेच्या वतीने दरमहा EPFO खात्यात पैसे हस्तांतरित केले जातात. ही एक निश्चित रक्कम असते, जी तुमच्या पगारातून कापली जाते आणि पीएफ खात्यात जमा केली जाते. तुमची संस्था देखील या खात्यात समान रक्कम योगदान देते त्याला पीएफ म्हटलं जातं.
कर्मचारी भविष्य निधी संघटनेची (ईपीएफओ) 6 कोटीहून अधिक खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यावेळी त्यांची दिवाळी धूमधडाक्यात साजरी होऊ शकते. कारण पीएफ खातेधारकांच्या खात्यात लवकरच व्याजाची रक्कम हस्तांतरित केली जाणार असल्याची माहिती आहे. ईपीएफओ लवकरच 2020-21 साठी 6 कोटीहून अधिक ग्राहकांच्या खात्यात व्याज हस्तांतरित करण्याची घोषणा करू शकते असं खात्रीलायक सूत्रांकडून समजलं आहे. केंद्र सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी ग्राहकांच्या खात्यावर पीएफवरील 8.5 टक्के व्याज हस्तांतरित करण्यासाठी आधीच ग्रीन सिग्नल दिला आहे. कामगार मंत्रालयाने देखील या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे.यामुळे EPFO लवकरच ग्राहकांच्या खात्यात 8.5 टक्के व्याज रक्कम जमा करेल अशी सूत्रांची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या :