एक्स्प्लोर
पीएफ काढण्यासाठी आता फक्त एक पानी फॉर्म, प्रक्रिया आणखी सोपी
मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफ काढण्याची प्रक्रिया अधिक सुरळीत करण्यात आली आहे. पीएफमध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता पैसे काढण्यासाठी फक्त एक पानी फॉर्म भरून द्यावा लागणार आहे.
पीएफचे पैसे काढण्यासाठी लग्नपत्रिकेसारख्या कागदपत्रांची अट आता नसेल. मुलांच्या शिक्षणासाठी पैसे काढायचे असल्यास अगोदर संबंधित कर्मचाऱ्याला त्याच्या लग्नाची पत्रिकाही द्यावी लागत होती. मात्र अशा कागदपत्रांची अट आता शिथिल करण्यात आली आहे.
पीएफचे पैसे काढण्यासाठीची जाचक प्रक्रिया कर्मचाऱ्यांना त्रासदायक ठरत होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या नियमांनुसार पीएफ काढण्यासाठी विविध प्रकारची कायदपत्रे तसंच प्रमाणपत्र सादर करावी लागतात. उदाहरणार्थ घरखरेदी किंवा घराच्या बांधकामासाठी पैसे काढायचे असतील तर बिल्डरकडून मिळवायची सर्व कायगदपत्रे आणि घर खरेदीच्या नोंदणीचे पुरावे द्यावे लागतात. मात्र आता त्याची गरज लागणार नाही. केवळ स्वयंघोषणापत्र द्यावं लागेल.
नव्याने जारी करण्यात येणाऱ्या एक पानी फॉर्मनुसार पीएफ अकाऊंटशी आधार लिंक केलेलं असेल तर, एम्प्लॉयर म्हणजेच तुमच्या मालकाकडे किंवा कंपनीकडे जाण्याची गरज पडणार नाही. मात्र आधार लिंक नसेल तर एम्प्लॉयरची परवानगी अनिवार्य असेल.
कर्मचाऱ्यांना पीएफचे पैसे 6 ते 7 कारणांसाठी काढता येतात. नोकरी करत असताना पीएफची 90 टक्के रक्कम काढता येऊ शकते. नोकरी सोडून किमान दोन महिने पूर्ण झाले, असतील तर संपूर्ण रक्कम काढता येते.
दरम्यान वैद्यकीय कारणांसाठी पैसे काढण्यासाठी पूर्वीचीच प्रक्रिया असेल. कर्मचाऱ्यांना त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र देणं अनिवार्य असेल.
पीएफ प्रक्रिया लवकरच ऑनलाईन होणार
पीएफ आणि पेंशन संबंधित सर्व कामांची प्रक्रिया मे महिन्यापर्यंत ऑनलाईन होणार आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ईपीएफओने याबाबत माहिती दिली आहे.
पीएफचे पैसे काढण्यासाठी, पेंशन संबंधित आणि मृत कर्मचाऱ्यांच्या वारसाला त्याचा लाभ मिळण्याच्या कारणांसाठी ईपीएफओकडे जवळपास 1 कोटी अर्ज येतात.
ईपीएफओच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना केंद्राच्या सर्व्हरशी जोडण्याचं काम सध्या सुरु आहे. येत्या एक ते दोन महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर पीएफ, पेंशन संबंधित सर्व कामं ऑनलाईन करता येतील, असं ईपीएफओचे आयुक्त व्ही. पी. जॉय यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
बीड
भारत
Advertisement