एक्स्प्लोर
पाच राज्यातील निवडणुका आज जाहीर होणार!

नवी दिल्ली : निवडणूक आयोग आज 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाकडून हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, पंजाब या पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर करण्यात येतील. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पाचही राज्यांमध्ये आचारसंहिता लागणार आहे. उत्तर प्रदेश, गोवा यासह इतर राज्यांच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून निवडणूक आयोगाच्या माहितीची सर्वांना उत्सुकता लागली आहे. पाच राज्यातील विधानसभांची सध्यस्थिती
| राज्य | एकूण जागा | सत्ताधारी | मुख्यमंत्री |
| उत्तर प्रदेश | 404 | समाजवादी पार्टी (229) | अखिलेश यादव |
| पंजाब | 117 | शिरोमणी अकाली दल (54)+ भाजप (11) | प्रकाशसिंह बादल (अकाली दल) |
| उत्तराखंड | 71 | काँग्रेस+बसपा+उत्तराखंड क्रांती दल | हरीश रावत (काँग्रेस) |
| मणिपूर | 60 | काँग्रेस (50) | ओकराम इबोदीसिंग |
| गोवा | 40 | भाजप (21) | लक्ष्मीकांत पार्सेकर |
आणखी वाचा























