Manipur Election 2022 Date: मणिपूरमध्ये 60 जागांसाठी दोन टप्प्यात होणार मतदान, 10 मार्चला मतमोजणी
आज निवडणूक आयोगाने 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये मणिपूर राज्यात 60 जागांसाठी दोन टप्प्यात निवडणूक होत आहे.
Manipur Election 2022 Date : एकीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाने 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने आज जाहीर केला. यामध्ये मणिपूर राज्यात विधानसभेच्या 60 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. मणिपूरमध्ये मतदानाचा पहिला टप्पा हा 27 फेब्रुवारीला तर दुसरा टप्पा हा 3 मार्चला पार पडणार आहे. तर 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.
मणिपूर राज्यात 60 जागांसाठी मतदान होत आहे. मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ हा 19 मार्च 2022 ला संपत आहे. त्यापूर्वी राज्यात नवीन सरकार स्थापन होण्याची प्रकिया पूर्ण केली जाणार आहे. 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने नॅशनल पीपल पार्टी आणि अन्य काही सदस्यांच्या पाठिंब्याच्या आधारे एन बिरेंद्र सिंह या मुख्यमंत्री केले होते. सध्या राज्यात भाजपचे सरकार आहे. ही सत्ता टिकवण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान आहे. तर भाजपला सत्तेपासून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भाजपने यावेळी मणिपूरमध्ये 40 जागांवर विजय मिळवण्याचे निश्चित केले आहे.
2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मणिपूर विधानसभेच्या निवडणुकीत 21 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला इतर दुसऱ्या पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला होता. तर दुरसीकडे राज्यात 28 जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला मात्र, विरोधात बसावे लागले होते. मणिपूर राज्यात जास्त काळ काँग्रेसचेच सरकार राहिले आहे. मात्र, मागच्या म्हमजे 2017 च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने सत्तेची समीकरणे जुळवत मणिपूरमध्ये सत्ता स्थापन केली होती. मागच्या 5 वर्षात मणिपूरमध्ये हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात भाजपला यश मिळाल्याचा दावा गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. जोपर्यंत स्थैर्य आणि शांतता नाही तोपर्यंत विकास अशक्य असल्याचेही शह म्हणालेत.
पक्षीय बलाबल
एकूण जागा - 60
बहुमताचा आकडा - 31
काँग्रेस - 28
भाजप - 21
इतर - 11
कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मतदान केंद्रावर असणारे सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल. डिजिटल, व्हर्च्युअल पद्धतीने प्रचार करावा, असेही निवडणूक आयोगाने सांगितले. 15 जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. रात्री 8 नंतर निवडणूक प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच डोअर टू डोअर प्रचारासाठी पाच लोकांना परवानगी देण्यात आली आहे. प्रचारादरम्यान कोरोना नियमांचं पालन करणे बंधनकारक असेल. निवडणुका जाहीर केल्यानंतर उत्तरप्रेदशात आचार संहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुकांदरम्यान कोरोनासंबंधित नियमांचे देखील पालन करयाचे आहे. यामध्ये सर्व पदयात्रा, सभांवर बंदी घालण्यात आलेली आहे. निवडणुक काळात कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.