Eid Mubarak 2022 : ईद मुबारक! देशभरात नमाज अदा करत मुस्लिम बांधवांनी दिल्या शुभेच्छा, अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लिम ऐक्याची ईद
Eid Mubarak 2022 : देशभरात रमजान ईद साजरी, नमाज अदा करत मुस्लिम बांधवांनी दिल्या शुभेच्छा, अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लिम ऐक्याची ईद
LIVE
Background
Eid-Ul-Fitr 2022 : देशासह जगभरात आज 'ईद-उल-फित्र' म्हणजेच 'रमजान ईद' साजरी केली जात आहे. हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण आहे. ईद हा मुस्लिम धर्माचा सर्वात मोठा सण मानला जातो. प्रत्येक मुस्लिम बांधव या खास दिवसाची वाट पाहत असतात. या दिवशी प्रत्येकजण आपल्या प्रियजनांना मिठी मारत त्यांना ईदच्या शुभेच्छा देतो. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर ईद-उल-फित्र साजरी केली जाते. रमजान महिन्यातील 30 दिवसांच्या उपवासानंतर (रोजा) ईदचा सण सर्वांमध्ये उत्साह घेऊन आला आहे. सर्व मशीद आणि ईदगाहमध्ये नमाज पठणासाठी लोक जमले आहेत. लोक एकमेकांना मिठी मारत ईदच्या शुभेच्छा देत आहेत. कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर पहिल्यांदाच ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातं आहे.
महिनाभराच्या रमजाननंतर अखेर सोमवारी ईदचा चंद्र दिसला. चंद्र दिसताच लोकांनी एकमेकांना मिठी मारली आणि अभिनंदन केलं. ईदचा चंद्र दिसल्याने सोमवारी शेवटची नमाज-ए-तरावीहची झाली. रमजानचा चंद्र दिसल्यानंतर मशिदींमध्ये सुरू झालेल्या तरावीहच्या विशेष नमाजाची सांगता झाली. मौलाना आणि मौलवी यांनी ईदचा सण शांततेत आणि प्रेमानं साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.
शव्वालचा चंद्र पाहून साजरी केली जाते ईद
ईद हा सण शव्वालचा चंद्र पाहून साजरा केला जातो. शव्वाल हे अरबी कॅलेंडरमधील एका महिन्याचे नाव आहे. हा महिना रमजान महिन्यानंतर येतो. शव्वाल महिन्याच्या पहिल्या तारखेला ईद-उल-फित्र साजरी केली जाते. ईद उल फित्रला मिठी ईद असेही म्हणतात. या दिवशी शेवया किंवा खीरसह अनेक गोड पदार्थ बनवले जातात. नंतर लोक एकमेकांच्या घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा देतात.
पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा दिल्या. 'हा सण आपल्या समाजात एकता आणि बंधुभावाची भावना वाढवेल. मी सर्व देशवासियांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो अशी प्रार्थना करतो. त्याचवेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी म्हणाले की, ईद मुबारक! हा पवित्र सण प्रेमाचा भाव जागृत करणारा आणि आपणा सर्वांना बंधुभाव आणि सौहार्दाच्या बंधनात बांधून घेवो', असं ट्विट पंतप्रधानांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ईद-उल-फित्रच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. हा शुभ सोहळा आपल्या समाजात एकता आणि बंधुभावाची भावना वाढवेल. मी सर्व देशवासियांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो अशी प्रार्थना करतो. त्याचवेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी म्हणाले की, ईद मुबारक! हा पवित्र सण प्रेमाचा भाव जागृत करणारा आणि आपणा सर्वांना बंधुभाव आणि सौहार्दाच्या बंधनात बांधून घेवो.
mumbai : हाजीअली दर्ग्यात जाण्यासाठी मुस्लिम बांधवाची मोठी गर्दी, दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम
mumbai : हाजीअली दर्ग्यात जाण्यासाठी मुस्लिम बांधवाची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जंक्शनवर पोलिसांचा फौजफाटा वाढविण्यात आला आहे.
Daund : दौंड आमदार राहुल कुल यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या
Nanded : तब्बल दोन वर्षांनंतर प्रथमच नांदेडात त्याच उत्साहात आणि आनंदात नमाज पठण करूण "रमजान ईद" साजरी करण्यात आली
Buldhana News : ईदच्या दिवशी गावातील हिंदूंनी मस्जित साठी दिला 'भोंगा' भेट
Buldhana News : बुलढाणा तालुक्यातील केळवद गावातील नागरिकांनी आज ईद आणि अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनोखं असं एकोप्याचं दर्शन देत गावातील मस्जितीला गावकाऱ्यांनी मिळून एक लाऊड स्पीकर भेट म्हणून देत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेचा असाही विरोध केला आहे. केळवद हे पाच हजार लोकसंख्येच गाव असून गावात तीन टक्के मुस्लिम समाजाची लोकसंख्या आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गुण्या गोविंदानं आम्ही राहत असून गावात एक छोटीशी मशिद आहे. ज्यावर आजपर्यंत भोंगा नव्हता पण आज ईद च्या पर्वावर गावातील हिंदू नागरिकांनी मस्जितसाठी भोंगा खरेदी करून भेट म्हणून दिला आहे , यावेळी सरपंचासह गावातील नागरिकांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचा विरोध केला.
Hingoli News : मुस्लिम बांधवांनी ईद निमित्त केली सामुदायिक नमाज अदा
Hingoli News : आज रमजान ईद निमित्त हिंगोली शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी ईदनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या. पवित्र आशा रमजान महिन्यातील रोजे म्हणजेच उपवास संपल्यानंतर आणि मागील दोन वर्ष कोरोना काळातील निर्बंधांनंतर आज नमाज अदा करण्यासाठी सर्व मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर एकत्र आले होते. रमजान ईदच्या या पवित्र दिवशी शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी हिंगोलीमधील ईदगाह मैदानावर एकत्र येत सामुदायिक नमाज पठण केले आहे. यावेळी शहरातील मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव उपस्थित होते.