एक्स्प्लोर
झाकीर नाईकच्या IRF ची 18.37 कोटींची संपत्ती जप्त
मुंबई : अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीनं इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक झाकीर नाईकवर कारवाई केली आहे. झाकीर नाईकचा एनजीओ इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (IRF) ची 18 कोटी 37 लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
30 डिसेंबर 2016 रोजी ईडीनं झाकीर नाईक आणि इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनविरोधात बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. एनआयएने 7 मार्चला झाकीर नाईकला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. मात्र त्याच्या गैरहजेरीनंतर 30 मार्चला दिल्लीतील एनआयएच्या मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
धार्मिक आणि वांशिक स्तरावर दोन समूहांमध्ये तेढ वाढवल्याचा आरोप झाकीर नाईकवर आहे. झाकीर नाईक आणि त्याच्या एनजीओच्या बँक खात्याशी निगडीत कागदपत्रं आणि बँक व्यवहारांच्या तपशीलांची छाननी ईडीने सुरु केली आहे.
झाकीर नाईक आणि इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला यापूर्वीही अनेकवेळा समन्स बजावण्यात आलंय. तसंच दहशतवादविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
Advertisement