Lalu Prasad Yadav : लालू प्रसाद यादव आणि कुटुबीयांची 6 कोटींची मालमत्ता जप्त; लँड फॉर जॉब प्रकरणात ईडीची मोठी कारवाई
Land For Job Scam: लालू प्रसाद यादव केंद्रात रेल्वेमंत्री असताना त्यांच्या कुटुंबीयांनी रेल्वेत नोकरीच्या बदल्यात भेटवस्तू आणि जमिनी घेतल्याचा आरोप आहे.
![Lalu Prasad Yadav : लालू प्रसाद यादव आणि कुटुबीयांची 6 कोटींची मालमत्ता जप्त; लँड फॉर जॉब प्रकरणात ईडीची मोठी कारवाई ed action on lalu prasad yadav wife and daughter attaches assets of 6 crore in land for job scam marathi Lalu Prasad Yadav : लालू प्रसाद यादव आणि कुटुबीयांची 6 कोटींची मालमत्ता जप्त; लँड फॉर जॉब प्रकरणात ईडीची मोठी कारवाई](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/7/2017/05/05080558/RJD-conference_lalu-yadav3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ED Action On Lalu Prasad Yadav : लँड फॉर जॉब प्रकरणात मोठी कारवाई करताना अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबाची 6 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कथित 'जमिनीच्या बदल्यात नोकरी' घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. सीबीआयच्या पथकाने याप्रकरणी लालू प्रसादांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांची चौकशी केली आहे.
लालू प्रसाद (Lalu Prasad Yadav) यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही राजकीय षडयंत्राचा भाग आहे. ईडीच्या या कारवाईमुळे 'लँड फॉर जॉब'चे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सीबीआयने यापूर्वी दोनदा या प्रकरणाचा तपास केला असून त्यांना कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याचं सांगण्यात येतंय. त्यानंतर आता ईडीने या प्रकरणाचा तपास करत ही कारवाई केली आहे.
ED attaches Rs 6 cr assets of RJD chief Lalu Prasad's wife Rabri Devi, daughter Misa Bharti and others in land-for-jobs case: Officials
— Press Trust of India (@PTI_News) July 31, 2023
विशेष म्हणजे, 'लँड फॉर जॉब' प्रकरणात मे महिन्यात सीबीआयच्या पथकाने देशभरात नऊ ठिकाणी छापे टाकले होते. सीबीआयने पाटणा, आरा, भोजपूर, दिल्ली आणि गुरुग्राम येथे छापे टाकले होते. बिहारचे माजी मंत्री प्रेमचंद गुप्ता यांच्या घरावरही सीबीआयने छापे टाकले. यासोबतच राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या जवळच्या आमदार किरण देवी यांच्या पाटणा आणि आरा येथील घरांवर सीबीआयने छापे टाकले.
सक्तवसुली संचालनालयाने लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या तसेच त्यांच्या सहकाऱ्यांची मालमत्ता या तपासाचा भाग म्हणून जप्त केली आहे. ईडीने मालमत्ता जप्त करण्यासाठी मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा (पीएमएलए) अंतर्गत तात्पुरता आदेश जारी केला आहे.
ईडीने या प्रकरणात आतापर्यंत लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, मुलगी मीसा भारती (राज्यसभेतील राजद खासदार), चंदा यादव आणि रागिणी यादव यांचे जबाब नोंदवले आहेत.
What Is Land For Job Scam : काय आहे संपूर्ण प्रकरण?
हे प्रकरण 2004 ते 2009 दरम्यानचं असल्याचं सांगण्यात येतंय. राजदचे लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना त्यांच्या कुटुंबीयांना कथितपणे भेटवस्तू आणि जमिनी घेतल्याचा आरोप आहे. रेल्वेमध्ये नोकरी लावण्याच्या बदल्यात उमेदवारांकडून जमिनी लाचेच्या स्वरुपात घेतल्याचा आरोप करण्यात येतोय. सीबीआयने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, भारतीय रेल्वेच्या नियमांचे आणि प्रक्रियेचे उल्लंघन करून रेल्वेमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या होत्या.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)