एक्स्प्लोर
उत्तर भारत भूकंपानं हादरला, दिल्ली, हरियाणा जयपुरमध्ये भूकंपाचे धक्के
नवी दिल्ली: आज सकाळी 4.30वाजण्याच्या सुमारास राजधानी दिल्लीसह उत्तर भारताला भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील बावल भागात असल्याचे सांगण्यात येत आहे. या भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल होता.
या भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, भूकंपाचे धक्के जवळपास 30 सेकंद जाणवत होते. या भूकंपामुळे दिल्ली एनसीआर, जयपूर, अलवर रेवाडी आदी भागात भूकंपाने काहीकाळ भीतीचे वातावरण होते.
दरम्यान, विज्ञान आणि पर्यावरण (CSE) ने दिलेल्या आहवालानुसार, दिल्लीतील 80 टक्के इमारती या पर्यावरण विभागाने आखून दिलेले नियम पाळत नसल्याने दिल्लीमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू स्थिरावला, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली आहे. सीएसईचे वरिष्ठ संशोधनकर्ते अविकल सोमवंशी यांच्या मते, दिल्लीत कमी तीव्रतेचा भूकंपही मोठे नुकसान पोहचवू शकतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement