(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Duplicate Pan Card : पॅनकार्ड हरवलंय? चिंता नको, सोप्या स्टेप्स फॉलो करुन मिळवा ड्युप्लिकेट प्रत
How to get Duplicate PAN Card : तुमचे पॅनकार्ड हरवलं असल्यास आता घाबरून जाण्याचं काही कारण नाही. या काही सोप्प्या पद्धतीच्या माध्यमातून तुम्ही तुमचे दुसरे पॅनकार्ड प्राप्त करू शकता
How to get Duplicate PAN Card : भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आणि खासकरुन नोकरी करणाऱ्यांसाठी पॅनकार्ड म्हणजे, सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक. पण अनेकदा एखाद्या व्यक्तीचं पॅनकार्ड हरवतं. त्यामुळे आर्थिक व्यवहारांत अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक व्यवहार खोळंबू शकतात.
जर तुमचंही पॅनकार्ड हरवलं असेल , तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला काही सोप्या मार्गांचा अवलंब करता येणार आहे. अगदी सोप्या प्रक्रियेनंतर पॅनकार्ड परत मिळणार आहे. जाणून घेऊया प्रक्रियेबाबत...
1. जर तुमचं पॅनकार्ड हरवलं असेल तर सर्वप्रथम 'इन्कम टॅक्स पॅन सर्व्हिसेस युनिट'च्या वेबसाइटवर जा आणि त्यावरील 'रीप्रिंट ऑफ पॅनकार्ड' हा पर्याय निवडा. हा पर्याय फक्त त्याच लोकांसाठी असणार आहे ज्यांना, आधीच पॅनकार्ड दिले गेले आहेत, पण काही कारणास्त त्या व्यक्तींचे पॅनकार्ड त्यांच्याकडून हरवलं आहे. त्यामुळे अशाच व्यक्तींना पॅन कार्ड कार्डची दुसरी प्रत दिली जाईल.
2. ही लिंक उघडल्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म दिसेल, जो तुम्हाला पूर्णपणे भरावा लागेल, पण लक्षात ठेवा की, उजव्या बाजूला असणाऱ्या बॉक्समधे कोणात्याही पर्यायासमोर टिक करू नये. फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला 105 रुपये भरावे लागतील. तुम्ही या अर्जाचे पेमेंट क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, डिमांड ड्राफ्ट किंवा चेकद्वारे देखील करू शकता.
3. यानंतर त्या भरून झालेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्या आणि त्यावर तुमचा फोटो चिकटवा. सोबतच स्वतः ची सही करा. जर तुम्ही DD किंवा चेकद्वारे पैसे देणार असल्यास तिथे चेक नंबर भरा आणि नंतर NSDL च्या पुणे कार्यालयात पाठवून द्या. यासोबतच जन्मतारखेचा दाखला देखील तिथे पुरावा म्हणून द्या.
4. तुम्हाला तुमचे डुप्लिकेट पॅनकार्ड 15 दिवसांच्या आत मिळेल.
असा करा ऑनलाईन अर्ज :
1. सर्वप्रथम https://www.tin-nsdl.com/ वेबसाईटवर जा.
2. Home Page वर क्लिक करा.
3. समोर आलेला Reprint of PAN Card हा पर्याय निवडा.
4. येथे तुम्ही तुमचे वैयक्तीक डिटेल भरा आणि चेक बॉक्सवर क्लिक करा.
5. त्यानंतर तुमचा ई-मेल आयडी आणि रजिस्टर मोबाईल नंबर टाकून येणारा ओटीपी प्रविष्ट करून ई-मेल आणि नंबर व्हेरिफाय करून घ्या.
6. 50 रुपये शुल्क भरा आणि प्रिंट या पर्यायावर क्लिक करा. या ॲानलाईन अर्जाची प्रत स्वत: जवळ ठेवा.
7. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल. या मेसेजद्वारे तुम्ही आपले ( Duplicate PAN Card ) म्हणजेच ( ई-पॅन ) e-Pan card डाउनलोड करू शकता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :