(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Online Card Usage: कार्डद्वारे ऑनलाईन पेमेंट पद्धतीत बदल; RBI कडून टोकनायझेशनचे नवे नियम जारी
पेमेंट एग्रीगेटर, व्यापाऱ्यांना RBI च्या टोकनायझेशनच्या नवीन नियमांनुसार डिसेंबर 2021 नंतर ग्राहक कार्ड तपशील संग्रहित करण्याची परवानगी नाही.
Online Card Usage: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) टोकनायझेशनसाठी नवीन नियम जारी केले आहेत. नवीन नियमांतर्गत डेबिट कार्डद्वारे पेमेंट करण्याच्या पद्धतींमध्ये बदल होणार आहेत. RBI कार्ड जारी करणाऱ्यांना पेमेंट एग्रीगेटर आणि व्यापाऱ्यांसह कार्ड टोकनाईझ करण्याची परवानगी देते. त्याचबरोबर नवीन नियमांमध्ये प्रायव्हसीकडेही लक्ष देण्यात आले आहे.
पेमेंट एग्रीगेटर, व्यापाऱ्यांना RBI च्या टोकनायझेशनच्या नवीन नियमांनुसार डिसेंबर 2021 नंतर ग्राहक कार्ड तपशील संग्रहित करण्याची परवानगी नाही. तसेच टोकन प्रणाली अंतर्गत प्रत्येक व्यवहारासाठी कार्ड तपशील इनपुट करण्याची आवश्यकता राहणार नाही. येत्या नवीन वर्षापासून हे नियम पूर्णपणे लागू होतील.
RBI allows card issuers to tokenise cards on file with payment aggregators & merchants; payment aggregators, merchants not permitted to store customer card details after December; no requirement to input card details for every transaction under the tokenisation arrangement pic.twitter.com/R0s6U7rXGA
— ANI (@ANI) September 7, 2021
नवीन नियमांमध्ये कार्डधारकाच्या डेटाच्या प्रायव्हसीची काळजी घेण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार कार्ड जारी करणारी बँक किंवा कार्ड नेटवर्क व्यतिरिक्त कार्ड पेमेंटवर कोणताही कार्ड डेटा स्टोरेज केले जाऊ शकत नाही. परंतु व्यवहार ट्रॅकिंगसाठी मर्यादित डेटा संग्रहित केला जाऊ शकतो. यामध्ये कार्ड क्रमांक आणि कार्ड जारीकर्त्याच्या नावाचे शेवटचे चार अक्षर संग्रहित करण्याची परवानगी दिली जाईल.
म्हणजेच यापुढे आता तुमच्या कार्डचा नंबर तुम्ही शेअर न करताही पेमेंट करता येणार आहे. टोकनायजेशनमध्ये तुम्हाला तुमचे कार्ड डिटेल टाकण्याची गरज नाही. त्याऐवजी टोकन नावाचा एक पर्यायी क्रमांक मिळणार आहे, जो तुमच्या कार्डाशी लिंक असेल. ज्याचा वापर करून तुमच्या कार्ड तपशील तुम्ही सुरक्षित ठेवू शकता आणि पेमेंट करू शकता.
इतर बातम्या