एक्स्प्लोर

अंधत्वावर मात करत जयंतचं यूपीएससीत यश, नियुक्तीसाठी संघर्ष सुरुच

गेल्या वर्षी यूपीएससी परीक्षेत जयंत मंकलेने संपूर्ण देशातून 923वा क्रमांक पटकावला. मात्र केवळ अंधत्वामुळे यूपीएससी त्याला कुठलीच पोस्ट सध्या द्यायला तयार नाही.

नवी दिल्ली : यूपीएससी परीक्षेत आपल्या अंधत्वावर मात करत यश मिळवणाऱ्या जयंत मंकले या विद्यार्थ्यावर आपल्या गुणवत्तेच्या जोरावर मिळवलेल्या पोस्टसाठी सरकार दरबारी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. मागच्या वर्षी झालेल्या यूपीएससी परीक्षेत जयंतने संपूर्ण देशातून 923वा क्रमांक पटकावला.

मात्र या यशानंतरही केवळ त्याच्या अंधत्वामुळे यूपीएससी त्याला कुठलीच पोस्ट सध्या द्यायला तयार नाही. दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पोस्टमधील काही पोस्ट भरल्या गेलेल्या नाहीत. तरीही हा प्रकार सुरू आहे. याचं कारण सांगितलं जातंय ते देखील संतापजनक आहे.

सध्या ज्या पोस्ट रिक्त आहेत, त्या पूर्ण अंधत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नाहीत. त्या जागांवर ते काम करू शकणार नाही. इंडियन फॉरेन सर्विस, इंडियन रेल्वे पर्सनल इंडियन सिव्हिल अकाउंट सर्विस या सेवा रिक्त असूनही त्या दिल्या गेलेल्या नाहीत.

विशेष म्हणजे यूपीएससी परीक्षा घेताना दृष्टिहीन विद्यार्थ्यांमध्ये कमी अंधत्व, पूर्ण अंधत्व असा भेद करत नाही. मग नेमका पोस्ट देतानाच हा भेद का? आणि उलट पूर्ण अंध असलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा पास करण्यासाठी जास्त त्रास सहन करावा लागतो, ही बाब प्रशासनाच्या डोक्यात शिरायला तयार नाही. त्यामुळे आता आपल्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी जयंतनं पंतप्रधानांना साकडे घालायचे ठरवलं.

दिव्यांग शब्द आणून अपंगांबद्दलची आपली संवेदना दाखवणारे पंतप्रधान आता या प्रकरणाकडे गांभीर्याने बघून जयंतला न्याय मिळवून देणार का हा प्रश्न आहे. यूपीएससी परीक्षेत आपल्या अपंगत्वावर मात करत जिद्दीने यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने झगडावे लागल्याची याआधीही उदाहरणे आहेत.

दोन वर्षांपूर्वी प्रांजल पाटील या विद्यार्थिनीला ही अशाच पद्धतीने सरकारी असंवेदनशीलतेचा अनुभव आला होता. मात्र नंतर दुसऱ्या प्रयत्नात तिने सगळ्यांच्या नाकावर टिच्चून यश मिळवलं. सध्या ती आयएएस म्हणून काम करत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAvinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Embed widget