एक्स्प्लोर
बिल न भरल्यामुळे रुग्णाची अडवणूक करणं आता गुन्हा ठरणार!
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चार्टर्स ऑफ पेशंट राईट्स आराखडा प्रसिद्ध केला आहे. यानुसार, बिलाचे पैसे न भरल्याने रुग्णाला डिस्चार्ज न देणं किंवा रुग्णाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देणं, हे गुन्हा ठरणार आहे.

मुंबई : डिस्चार्ज घेताना बिल भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे अनेक रुग्णांची अडवणूक झाल्याचं आपण पाहतो. एवढंच नाही, तर पैसे न भरल्यास मृतदेह सोडण्यासही रुग्णालये नकार देतात. पण आता बिलाचे पैसे न भरल्याने रुग्णाला डिस्चार्ज न देणं किंवा रुग्णाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देणं, हे गुन्हा ठरणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चार्टर्स ऑफ पेशंट राईट्स आराखडा प्रसिद्ध केला आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने तयार केलेला पेशंट चार्टरचा हा आराखडा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. रुग्णांना कोणकोणते अधिकार आहेत, त्याबाबत सविस्तर माहिती यामध्ये देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक करुन तुम्ही हा अहवाल वाचून जागरुक नागरिक बनू शकता. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या या अहवालाचं विविध संघटनांकडून स्वागत करण्यात आलं आहे.
आणखी वाचा























