(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इराण-इस्त्रायलचा प्रवास करू नका, भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहा; पश्चिम आशियातील वादावर परराष्ट्र खात्याचे निर्देश जारी
Israel-Iran Conflict : इराण आणि इस्त्रायलमध्ये असलेल्या भारतीयांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि भारतीय दूतावासाच्या संपर्कात रहावं असं आवाहन भारतीय परराष्ट्र खात्यानं केलं आहे.
नवी दिल्ली : इस्त्रायल आणि इराण या दोन देशांदरम्यानच्या वादामध्ये आता भारतीय परराष्ट्र खात्याने (Ministry of External Affairs) निर्देश जारी केले आहेत. जोपर्यंत पुढची नियमावली जारी केली जात नाहीत तोपर्यंत इराणला जाऊ नका, त्या देशाचा प्रवास टाळा असं परराष्ट्र खात्याने म्हटलं आहे.
पश्चिम आशियातील सध्याची परिस्थिती पाहता पुढचे निर्देश येईपर्यंत इराण आणि इस्त्रायल या दोन देशांचा प्रवास टाळा. सध्या त्या देशात असलेल्या लोकांनी भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहा आणि त्या ठिकाणी नोंदणी करा असं परराष्ट्र खात्याने स्पष्ट केलं आहे. तसेत या दोन देशात असलेल्या भारतीयांनी गरज असेल तरच प्रवास करावा आणि आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहनही परराष्ट्र खात्याने केलं आहे.
Travel advisory for Iran and Israel:https://t.co/OuHPVQfyVp pic.twitter.com/eDMRM771dC
— Randhir Jaiswal (@MEAIndia) April 12, 2024
इराण 48 तासांत इस्त्रायलवर हल्ला करणार
पुढच्या 48 तासांमध्ये इराणकडून इस्त्रायलवर मोठा हल्ला होऊ शकतो असं वृत्त अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने त्याच्या एका विशेष रिपोर्टमध्ये दिलं आहे. या आधी इराणने इस्त्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. सिरीयातील इराणी दूतावासावर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये इराणच्या सुरक्षा रक्षक आणि अधिकारी मारले गेले. हा हल्ला इस्त्रायलने केला होता. त्याचा बदल आता इराण घेण्याच्या तयारीत आहे.
इस्रायल आणि अमेरिका हाय अलर्टवर
इराणच्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचे इस्रायलने स्पष्ट केले आहे. इराणने दिलेल्या हल्ल्याच्या धमकीनंतर इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू म्हणाले की, जो कोणी आमच्या देशावर हल्ला करेल त्याला जशास तसे उत्तर दिलं जाईल.
दरम्यान, इराणने दिलेल्या धमकीनंतर आता इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच आपल्या दूतावासांची सुरक्षा वाढवण्याचे निर्देशही दिले आहेत.
इस्रायलने इराणची सायबर पायाभूत सुविधा नष्ट करण्याची धमकी दिली आहे. इराणच्या हल्ल्यामुळे अमेरिकाही सतर्क आहे. इराणच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इस्रायलमधील अमेरिकन दूतावासाच्या कर्मचाऱ्यांना तेल अवीव, जेरुसलेम आणि बेरशेबा या शहरातून बाहेर प्रवास करू नये असे सांगितले आहे. फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनीचे नेत्यांनी इराणला संघर्ष वाढवू नये असं आवाहन केलं आहे.
ही बातमी वाचा: