एक्स्प्लोर
डिंपल यादव यांचं महाराष्ट्र कनेक्शन!
मुंबई: गेल्या महिनाभरापासून उत्तर प्रदेशातील राजकारणाचं केंद्रबिंदू ठरणाऱ्या डिम्पल यादव यांचं महाराष्ट्र कनेक्शन आता समोर आलं आहे.
अखिलेश आणि डिम्पल यादव... सोनिया आणि राजीव गांधी यांच्यानंतर कदाचित राजकारणातली ही सर्वात ग्लॅमरस जोडी असेल. पण बऱ्याच लोकांना माहित नसेल. सध्या उत्तर प्रदेशच्या कानाकोपऱ्यात सभांचा धडाका लावणाऱ्या डिंपल यांचा जन्म आपल्या पुण्यात झाला आहे.
15 जानेवारी 1978 रोजी पुण्यात डिंपल यांचा जन्म झाला. वडील सी. एस. रावत हे भारतीय लष्करात कर्नल होते. त्यामुळे डिंपल या फार काळ पुण्यात राहिल्या नाहीत. कधी भटिंडा, कधी अंदमान, कधी लखनौ... अशा बदल्या होत असल्यामुळे डिंपल यांनाही देशभ्रमंती करावी लागली.
पण 1995 मध्ये लखनौमध्येच असताना एका कॉमन फ्रेन्डमुळे डिंपल आणि अखिलेशची ओळख झाली आणि अखिलेश पहिल्या नजरेतच 17 वर्षीय डिंपलच्या प्रेमात पडले.
पुढची 4 वर्षे दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. पण उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्यानं अखिलेशला त्यांचं हे नातं समाजापासून लपवून ठेवावं लागलं. कालांतराने अखिलेश शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेले. पण तिथूनही पत्राद्वारे या दोघांची प्रेमकहाणी सुरु होती.
शिक्षण संपल्यानंतर पुन्हा घरी परतलेल्या अखिलेशची प्रेमकहाणी वडील मुलायम सिंह यांना कळली. सुरुवातीला प्रचंड विरोध झाला. पण अखिलेशची आजी मूर्तीदेवी यांनी मध्यस्थी केली आणि अखेर 1999मध्ये अवघ्या 21व्या वर्षी डिंपल रावत ही डिंपल यादव झाली.
सुरुवातीला काही काळ राजकारणी घरात रमणं डिंपल यांना कठीण गेलं. पण हळू हळू त्याही सरावल्या. राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना डिंपल यांना अखिलेशनं राजकीय आखाड्यात उतरवलं. पण पहिल्याच प्रयत्नाच डिंपल यादव अपयशी ठरल्या.
2009 साली झालेल्या पोटनिवडणुकीत फिरोझाबादमधून डिंपल यादव उभ्या होत्या. त्यांच्यासमोर काँग्रेसचे तत्कालीन नेते राज बब्बर यांचं आव्हान होतं. पण राज बब्बर यांनी त्यांचा सहज पराभव केला. पण डिंपल यादव तिथेच थांबल्या नाहीत. तर 2012मध्ये अखिलेश यादव यांच्या राजीनाम्यानं रिक्त झालेल्या कनौजच्या जागेवर डिंपल यादव उभ्या राहिल्या आणि देशातल्या चौथ्या बिनविरोध खासदार झाल्या. कारण डिंपल यादव यांच्यासमोर निवडणूक लढवण्याचे धाडस कुणीच केले नाही.
डिंपल यादव या मुळात राजकारणी नाहीत. कुटुंबवत्सल असलेल्या डिंपल यांनी स्वतःला राजकारणात रुळवलं. पण म्हणून, त्यांचं घरी मात्र, अजिबात दुर्लक्ष झालं नाही. डिंपल यांना तीन मुलं आहेत. दोन मुले आणि एक मुलगी. राजकारणाव्यतिरिक्त दिवसातला ठराविक वेळ त्या मुलांसोबत घालवतातच.
सध्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमुळे समाजवादी पक्षात उभी फूट पडल्याच्या बातम्या आल्या. तसं झालंही. पण डिंपल यांनी मोठ्या खुबीनं प्रचाराचा भार आपल्या खांद्यावर घेतला.
काका-पुतण्यातल्या वादानं यादव परिवारातली यादवी शमली. पण त्याच यादवीतून एक नवा चेहरा उत्तर प्रदेशला मिळाला. जिचं नाव आहे डिंपल यादव...
संबंधित बातम्या:
अभिनेता रवीकिशन भाजपमध्ये, शाहांच्या उपस्थितीत प्रवेश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
क्राईम
Advertisement