Tihar jail | तिहार जेलचे 3468 कैदी गायब, कोरोनाच्या संक्रमणामुळे होते इमर्जन्सी पॅरोलवर बाहेर
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात तिहार जेलमधून (Tihar jail) अनेक कैद्यांना इमर्जन्सी पॅरोलवर सोडण्यात आलं होतं. आता त्यापैकी 3468 कैदी गायब असल्याचं समोर आलंय.
नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात देशभरातल्या अनेक तुरुंगातील कैद्यांची चांदी झाली होती. कोरोनामुळे तुरुंगात गर्दी होऊ नये आणि त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून अनेक कैद्यांना इमर्जन्सी पॅरोलवर सोडण्यात आलं होतं. दिल्लीच्या तिहार जेलमधूनही 6,740 कैद्यांची अशा प्रकारे इमर्जन्सी पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. आता त्यापैकी 3,468 कैद्यांचा कोणताही माग लागत नाही. ते सध्या कुठे आहेत याची कोणतीही माहिती पोलिसांना मिळत नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे तिहार जेलच्या प्रशासनाने आता या कैद्यांना पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांकडे मदत मागितली आहे.
तिहार जेलच्या काही कैद्यांनी सरेंडर केलं आहे तर काही कैदी सरेंडर करत आहेत. गायब असलेल्या कैद्यांपैकी काही कैद्यांना न्यायालयाचा नियमित जामीन मिळाला असल्याने त्यांनी प्रशासनासमोर सरेंडर केलं नाही. पण ही संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे आता गायब असलेल्या या कैद्यांना कसं पकडायचं हा प्रश्न तिहार जेल प्रशासन आणि दिल्ली पोलिसांसमोर आहे. तिहार जेल प्रशासन आता या गायब असलेल्या कैद्यांची संपूर्ण माहिती घेत आहे.
गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रसाराच्या सुरुवातीच्या काळात देशभरात कोरोनाला रोखण्याचं मोठं आव्हान होतं. तिहारमध्येही मोठ्या संख्येने कैदी एकत्र राहत असल्याने त्यांच्यामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना इमर्जन्सी पॅरोल देण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार 6,740 कैद्यांची इमर्जन्सी पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. आता त्यापैकी 3468 कैद्यांचा कोणताही माग लागत नाही.
देशभरात तसेच दिल्लीमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. दिल्लीतील तिहार जेलच्या 68 पेक्षा अधिक कैदी आणि 10 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये तुरुंग अधीक्षक तसेच जेलमधील दोन डॉक्टरांचाही समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Break The Chain : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू, आज निर्बंधांचा पहिला दिवस; काय सुरु, काय बंद?
- Qatar Drug Case | कतारमध्ये ड्रग्ज प्रकरणात बळीचा बकरा बनलेलं भारतीय दाम्पत्य दोन वर्षांनी मायदेशी परतलं
- World Art Day | जगभरात साजरा केला जातोय 'वर्ल्ड आर्ट डे', जाणून घ्या काय आहे त्याचं महत्व