(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Delhi Excise Policy Case: मनीष सिसोदिया यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, न्यायालयीन कोठडीत 3 एप्रिलपर्यंत वाढ
Manish Sisodia: दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी अटकत असलेले मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टाने सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे.
Manish Sisodia: दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टाने सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. आता ते 3 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहे. मनीष सिसोदिया सध्या ईडीच्या कोठडीत असून त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. सीबीआय प्रकरणातील न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर व्हीसीमार्फत न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणात सीबीआयने म्हटले आहे की, तपास अद्याप सुरू आहे आणि तो महत्त्वाच्या टप्प्यावर आहे.
सिसोदिया 22 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत आहे. या प्रकरणी राऊस अव्हेन्यू कोर्टाने शुक्रवारी मनीष सिसोदिया यांना 22 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर यांनी या प्रकरणाची तक्रार केली तेव्हा मनीष यांनी आपला फोन बदलला होता. परंतु केंद्रीय तपास यंत्रणेने त्यांच्या मोबाइल डेटा परत मिळवला होता, असे ईडीने न्यायालयाला सांगितले होते. आता केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्या मोबाईल आणि ईमेलमधून काढलेल्या डेटाचे विश्लेषण करत आहे आणि मनीष सिसोदिया यांची चौकशी करत आहेत.
Manish Sisodia: सिसोदिया यांचे वकील कोर्टात काय म्हणाले?
मनीष सिसोदिया यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की, ईडीने माजी उपमुख्यमंत्र्यांवर कोणत्याही गुन्ह्याचा उल्लेख केलेला नाही. केंद्रीय यंत्रणेने सांगावे गुन्ह्याच्या प्रक्रियेत काय झाले? सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असताना ईडीची चौकशी करण्याची काय गरज आहे, असेही ते म्हणाले. ईडी आता सीबीआयची प्रॉक्सी एजन्सी म्हणून काम करत आहे. याशिवाय मनीष सिसोदिया यांनी न्यायालयाला सांगितले की, गेल्या 7 दिवसांच्या कोठडीत दररोज केवळ अर्धा तास त्यांची चौकशी करण्यात आली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली.
दरम्यान, दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास यंत्रणेने सिसोदिया यांना 9 मार्च रोजी तिहार तुरुंगातून अटक केली होती. यानंतर 10 मार्च रोजी सिसोदिया यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने कोर्टाकडे सिसोदिया यांच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने माजी उपमुख्यमंत्र्यांना 17 मार्चपर्यंत (7 दिवस) कोठडी सुनावली होती. यापूर्वी 26 फेब्रुवारी रोजी सीबीआयने त्यांना 8 तासांच्या चौकशीनंतर दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात अटक केली होती. 21 मार्च रोजी दुपारी 2 वाजता सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी होणार आहे.