एक्स्प्लोर

वॉशिंग मशिनमध्ये पडून दिल्लीत जुळ्या भावांचा मृत्यू

नवी दिल्ली : वॉशिंग मशिनमध्ये पडल्यामुळे दिल्लीत तीन वर्षांच्या जुळ्या भावांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील रोहिणी भागातल्या अवंतिका कॉम्प्लेक्समध्ये घडलेल्या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. वॉशिंग मशिनमध्ये डोकं खाली असलेल्या अवस्थेत भावंडांचे मृतदेह आढळले आहेत. पोलिसांनी तपास सुरु केला असून प्रथमदर्शनी तरी हा अपघात असल्याचं मानलं जात आहे. पाण्यात बुडल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितल आहे. कसा झाला अपघात? शनिवारी दुपारी 12 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास राखी यांनी धुण्याचे कपडे काढून ठेवले होते. टॉप लोडिंग सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशिनमध्ये अर्ध्यापर्यंत पाणी भरलं होतं. त्याचवेळी निशू आणि लक्ष ही 3 वर्षांची जुळी भावंडं बाथरुमजवळ खेळत होती. त्यानंतर वॉशिंग पावडर आणण्यासाठी राखी जवळच्या दुकानात गेल्या. त्यावेळी त्यांचा 10 वर्षांचा आदित्य हा मोठा मुलगाही शाळेत गेला होता. घराबाहेर जाताना त्यांनी दरवाजा लॉक केला नव्हता. घरी परतण्यासाठी जास्तीत जास्त पाच ते सहा मिनिटांचा अवधी लागल्याची माहिती राखी यांनी पोलिसांना दिली. घरात त्यांना आपली दोन्ही मुलं कुठेच न दिसल्याने त्यांनी शोधाशोध केली. शेजारच्यांकडे चौकशी केल्यानंतरही दोघांचा पत्ता लागला नाही. घाबरलेल्या राखी यांनी पती रविंद्र यांना फोन केला. दहाव्या मिनिटांला रविंद्र ऑफिसमधून तडक घरी आले. दोघांनी पुन्हा मुलांची शोधाशोध सुरु केली. बाहेर मुलं कुठेच सापडत नसल्याने 1 वाजून 10 मिनिटांनी पती-पत्नी हवालदिल होऊन घरी परत आले. वॉशिंग मशिनजवळ जाताच त्यांना मोठा धक्का बसला. लक्ष आणि निशू ही दोन्ही मुलं डोकं खाली असलेल्या अवस्थेत मशिनमध्ये पडली होती. तात्काळ मुलांना जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
बर्थ डे दिवशीच भाईजानचा 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर; नेटीझन्सकडून दाद, भारतीय सैन्य अन् चीनचा संघर्ष पडद्यावर
बर्थ डे दिवशीच भाईजानचा 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर; नेटीझन्सकडून दाद, भारतीय सैन्य अन् चीनचा संघर्ष पडद्यावर
मोठी बातमी : सुनील तटकरे रायगडचा आका, त्यांच्याच घरी काळोखेंच्या हत्येचा प्लॅन ठरला, शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
मोठी बातमी : सुनील तटकरे रायगडचा आका, त्यांच्याच घरी काळोखेंच्या हत्येचा प्लॅन ठरला, शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप

व्हिडीओ

Khopoli Mangesh Kalokhe यांच्या हत्येचा CCTV, नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखेंचे पती मंगेश काळोखे
Sunil tatkare On mahayuti : आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर होणार
Sana Malik on BMC Election : भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट,नवाब मलिकांच्या घरात 3 उमेदवार
Sunil Tatkare On Alliance : मुंबईत राष्ट्रवादी युतीसोबत लढणार? तटकरे म्हणाले...
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
बर्थ डे दिवशीच भाईजानचा 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर; नेटीझन्सकडून दाद, भारतीय सैन्य अन् चीनचा संघर्ष पडद्यावर
बर्थ डे दिवशीच भाईजानचा 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर; नेटीझन्सकडून दाद, भारतीय सैन्य अन् चीनचा संघर्ष पडद्यावर
मोठी बातमी : सुनील तटकरे रायगडचा आका, त्यांच्याच घरी काळोखेंच्या हत्येचा प्लॅन ठरला, शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
मोठी बातमी : सुनील तटकरे रायगडचा आका, त्यांच्याच घरी काळोखेंच्या हत्येचा प्लॅन ठरला, शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
Salman Khan Birthday: इकडं भाईजान साठीत पोहोचला, तिकडं एका मुलाची आई झालेल्या कॅटरिनाच्या हटके शुभेच्छांनी भूवया उंचावल्या
इकडं भाईजान साठीत पोहोचला, तिकडं एका मुलाची आई झालेल्या कॅटरिनाच्या हटके शुभेच्छांनी भूवया उंचावल्या
WTC Point Table : इंग्लंडच्या ऑस्ट्रेलियावरील विजयानं WTC गुणतालिकेत उलटफेर, टीम इंडियाला फायदा की तोटा, जाणून घ्या
इंग्लंडच्या ऑस्ट्रेलियावरील विजयानं WTC गुणतालिकेत उलटफेर, टीम इंडियाला फायदा की तोटा, जाणून घ्या
ह्रदयद्रावक... विहिरीतील मोटार काढताना विजेचा धक्का; बाप लेकासह चौघांचा जागीच मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... विहिरीतील मोटार काढताना विजेचा धक्का; बाप लेकासह चौघांचा जागीच मृत्यू, गावावर शोककळा
Video: आलिशान एसयूव्हीला रोप बांधून थेट सुपर मार्केटमधील एटीएम उखडून बाहेर खेचलं, रोडने फरफटत नेणार तेवढ्यातच...
Video: आलिशान एसयूव्हीला रोप बांधून थेट सुपर मार्केटमधील एटीएम उखडून बाहेर खेचलं, रोडने फरफटत नेणार तेवढ्यातच...
Embed widget