एक्स्प्लोर
भाजप नेत्याकडून मायावतींची वारांगणेशी तुलना, भाजपकडून निलंबनाची कारवाई
नवी दिल्ली: बसपा सुप्रीमो मायावतींवर टिका करताना यूपीच्या भाजप उपाध्यक्ष दया शंकर सिंह यांची जीभ घसरली. त्यांनी मायावतींची तुलना वारांगनेशी केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दया शंकर यांच्या या टिप्पणी नंतर त्यांना तत्काळ पदावरून हटवून पक्षातूनही हकालपट्टी केली आहे. उत्तर प्रदेश भाजप प्रदेश अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांनी ही माहिती दिली.
यूपी भाजप उपाध्यक्ष दया शंकर सिंहने मायावतींवर टिका करताना तिकीट वाटप करण्याऐवजी तिकीट विक्री केल्याचा आरोप केला होता. तसेच यावेळी सिंहयांनी टिका सर्वात हिन पातळी गाठली. यामुळे सध्या सिंह यांना पक्षातून निलंबित केले.
जेटली, मौर्य आणि दया शंकर यांनी मागितली माफी
दया शंकर यांच्या टिकेनंतर सुरु झालेला हा वाद चिघळल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दया शंकर यांचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. याबरोबरच यूपी भाजप अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांनीही मायावतींची जाहीर माफी मागितली आहे.
मायावती भडकल्या
भाजप नेत्याच्या या संतापजनक टिपण्णीने मायावती भडकल्या. भाजप नेत्याच्या या वक्तव्यावरून त्यांची वैचारीक पातळी कळते असे म्हणले आहे. तसेच भाजप कशाप्रकारे हतबल झाले आहे, असे म्हटले आहे.
मायावतींनी राज्यसभेत प्रतिक्रीया देताना, दया शंकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यीच मागणी केली आहे. दया शंकर यांची टिका देशातील सर्व मुलींसाठी असल्याचे म्हटले आहे.
दयाशंकर सिंह यांना तातडीने अटक करा. जर यामुळे उत्तर प्रदेशात हिंसाचार झाला, तर त्याला मी जबाबदार असणार नाही, असं मायावती यांनी राज्यसभेत सांगितलं.
काय म्हणाले दया शंकर?
मायावतींवर टिका करताना दया शंकर यांनी त्यांची तुलना वारांगनेशी केली. तसेच त्या तिकीट वाटपात जे पैसे देतील त्यांनाच तिकीट देतात असे म्हटले आहे.
आम आदमी पक्षाकडूनही निषेध
आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष यांनी यावर ट्विट करून भाजपवर हल्ला चढवला आहे. भाजप दलित वरोधी असल्याचा यापेक्षा वेगळा पुरावा आणखी काय असू शकेल, असा प्रश्न त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement