एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी मुदत पुन्हा वाढवली
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) शनिवारी करदात्यांना पॅन क्रमांक आणि आधार एकमेकांशी लिंक करण्यासाठी दिलेली मुदत पुढील वर्षाच्या मार्चअखेरपर्यंत वाढवली.
मुंबई : पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 31 मार्च 2019 पर्यंत पॅन आधारशी लिंक करता येईल. यापूर्वी 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली होती.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) शनिवारी करदात्यांना पॅन क्रमांक आणि आधार एकमेकांशी लिंक करण्यासाठी दिलेली मुदत पुढील वर्षाच्या मार्चअखेरपर्यंत वाढवली.
पॅन-आधार लिंक करण्यासाठी आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या मार्चअखेरपर्यंत 33 कोटींपैकी 16 कोटी 65 लाख पॅन कार्ड आधारशी लिंक केल्याची माहिती आहे.
केंद्र सरकारने बँक खाते, मोबाईल क्रमांक यासाठी आधार लिंक अनिवार्य केलं आहे. शिवाय एलपीजी गॅसमधील अनुदान आणि इतर योजनांचा लाभ मिळवण्यासाठी केंद्राने केलेल्या आधार सक्तीचं प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे.
आधार कार्ड पॅनसोबत कसं लिंक कराल?
आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेलं नाव टाकावं लागेल.
वरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून ‘लिंक आधार’ या पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर लगेच तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक होईल.
दरम्यान आधार कार्ड आणि पॅनवर असणारी जन्म तारीख एक असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.
संबंधित बातम्या :
मोबाईल आणि आधार लिंक करताना या दहा गोष्टी लक्षात ठेवा
आधार कार्ड लिंकसाठी मेसेज पाठवून ग्राहकांना घाबरवू नका : सुप्रीम कोर्ट
बँक खात्याशी आधार लिंक न केल्यास काय होईल?
PPF आणि पोस्ट ऑफिस खात्यांना आधार लिंक करणं अनिवार्य
तुमचं बँक खातं आणि आधार लिंक आहे का? असं चेक करा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
मुंबई
निवडणूक
Advertisement