एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लग्नसमारंभावेळी चक्रीवादळाचा तडाखा, भिंत कोसळून 25 वऱ्हाड्यांचा मृत्यू
जयपूर : राजस्थानच्या भरतपूरमध्ये बुधवारी रात्री मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळात 25 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. चक्रीवादळादरम्यान घराची भिंत कोसळून ही दुर्घटना घडली आहे. एका लग्नसमारंभात सर्वजण जमले असताना हा प्रकार घडला आहे.
भरतपूरमध्ये एक विवाह सोहळा सुरु असतानाच जोरदार वादळ आणि पाऊस सुरु झाला. या वादळापासून बचाव करण्यासाठी वऱ्हाडी मंडळींनी मंगल कार्यालयाच्या भिंतीचा आडोसा घेतला. मात्र त्याचवेळी वादळामुळे तब्बल 80 फूटांची भिंत कोसळली. या भिंतीखाली दबून 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 4 लहान बालकं, 9 महिला आणि 12 पुरुषांचा समावेश आहे.
दरम्यान या प्रकारानंतर पोलीस आणि प्रशासनानं घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर मदतकार्य सुरु करण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement