Udayanraje Bhosale : सातारा जिल्ह्यात तब्बल चार वजनदार मंत्री, पालकमंत्रीपद कोणाला मिळावं? उदयनराजेंनी नाव सांगितलं!
सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले आज खासदार उदयनराजे भोसले यांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजेंना दिल्या शुभेच्छा दिल्या.
Udayanraje Bhosale : सातारा जिल्ह्यातील चारही मंत्र्यांकडे वजनदार खाती मिळाली आहेत. भाजपकडून शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून शंभुराज देसाई यांना पर्यटन, खाणकाम माजी सैनिक कल्याण खात्यांचा कारभार आहे. त्यामुळे देसाई यांना सुद्धा महत्त्वपूर्ण स्थान एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मकरंद पाटील यांना मदत आणि पुर्नवसन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे चौघांपैकी सातारच्या पालकमंत्रीपदावर कोणाची वर्णी लागणार? याची उत्सुकता आहे. मागील सरकारमध्ये शंभूराज देसाई यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी होती. त्यामुळे आपल्याकडेच जबाबदारी राहण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले आज खासदार उदयनराजे भोसले यांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजेंना दिल्या शुभेच्छा दिल्या. शिवेंद्रराजे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदीर या ठिकाणी जात भेट घेतली.
उदयनराजे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगल काम करु
यावेळी बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंबाबत वक्तव्य केलं. उदयनराजे भोसले यांनी माझ्या मंत्रीपदाबाबत भूमिका घेतली होती, याची आठवण करुन देत उदयनराजे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात भाजपची मोठी ताकद निर्माण झाली आहे. लोकसभेपासूनच चित्र बदलत गेलं आणि विधानसभेला महायुतीच्या जागा निवडून आल्या. उदयनराजे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगल काम करु असं वक्तव्य सार्वजनीक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं आहे.
साताऱ्याचं पालकमंत्रीपद शिवेंद्रराजे भोसले यांना मिळावं
शिवेंद्रराजे भोसले यांच्या हातून चांगलं काम होईल यात शंका नाही. जिल्ह्यातील सगळ्याच मंत्र्यांना शुभेच्छा आहेत. यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा ओळखला जातो. मात्र काँग्रेसनं फक्त घोषणाच केल्या. कोणत्या निकषानं पालकमंत्री दिलं जाईल हे माहित नाही. मात्र जिल्ह्यात ज्यांची संख्या जास्त त्यांनाच पालकमंत्रपद दिलं जावं आणि ते पालकमंत्रीपद हे शिवेंद्रराजे भोसले यांना मिळावं असे उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या