Anjali Damania on Dhananjay Munde : धनंजय मुंडे, कोण आहे हा? कार्यकर्ता आहे तुमचा? असे कार्यकर्ते लागतात तुम्हाला? अंजली दमानियांनी आणखी एक बंदुकधारी समोर आणला!
Anjali Damania on Dhananjay Munde : अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडवरील गुन्ह्यांची मालिकाच वाचतानाच आता रस्त्यावर हातात बंदूक घेणाऱ्या एकाचा व्हिडिओ रिट्विट करत धनंजय मुंडेंवर पुन्हा तोफ डागली आहे.
Anjali Damania on Dhananjay Munde : परळीसह बीड जिल्ह्यात गुन्हेगारीने थैमान घातलं असतानाच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. संतोष देशमुख हत्या आणि परभणीमध्ये सोमनाथ सुर्यवंशीच्या पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याने उद्रेकात आणखी भर पडली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडचे नाव आलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत आहेत.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिय यांनीही आता बीडमधील गुन्हेगारीवरून धनंजय मुंडेंवर प्रहार केला आहे. आज अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडवरील गुन्ह्यांची मालिकाच वाचतानाच आता रस्त्यावर खुलेआम हातात बंदूक घेणाऱ्या एकाचा व्हिडिओ रिट्विट करत धनंजय मुंडेंवर पुन्हा तोफ डागली आहे. दमानिया यांनी ट्विट करत मुंडे यांना तो बंदूकधारी कोण अशी विचारणा केली आहे.
काय म्हटलं आहे ट्विटमध्ये?
अंजली दमानिया यांनी व्हिडिओ रिट्विट करत धनंजय मुंडे …… कोण आहे हा ? कार्यकर्ता आहे तुमचा? उत्तर हवे आहे. सामान्य माणसात दहशत निर्माण करायला हे असे कार्यकर्ते लागतात तुम्हाला? अशी विचारणा केली आहे.
धनंजय मुंडे …….
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 23, 2024
कोण आहे हा ? कार्यकर्ता आहे तुमचा ?
उत्तर हवे आहे. @dhananjay_munde
सामान्य माणसात दहशत निर्माण करायला हे असे कार्यकर्ते लागतात तुम्हाला ? https://t.co/Deu24sKmkn
वाल्मिक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले
दरम्यान, अन्य एका ट्विटमध्ये दमानिया यांनी वाल्मिक कराडची गुन्हेगारी प्रवृत्तीची कुंडलीच सादर केली आहे. त्यांनी ट्विट करत त्यांनी म्हटले आहे की, वाल्मिक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले, 23 सेक्शन्स त्यापैकी अनेक सेक्शन 3 ते 4 वेळा देखील आहेत. एकूण 45 सेक्शन्स लागले आहेत. इतके गंभीर गुन्हे असलेला माणूस, धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर? त्यांना आधी मविअ ने थारा दिला आता महायुतीने. बीडमधून खूप फोन आले. खूप दहशत आहे या सगळ्यांची. लोकांनी जागायचं कसं?
वाल्मीक कारड वर फक्त परळीत १० वेळा FIR झाले, २३ सेक्शन्स त्यापैकी अनेक सेक्शन ३ ते ४ वेळा देखिल आहेत. एकूण ४५ सेक्शन्स लागले आहेत.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 23, 2024
इतके गंभीर गुन्हे असलेला माणूस, धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर? त्यांना आधी मविअ ने थारा दिला आता महायुतीने.
बीड मधून खूप फ़ोन… pic.twitter.com/9qQ7BrvsJa
इतर महत्वाच्या बातम्या