Cyber Crime : सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा, 'Digital Arrest'च्या जाळ्यात ओढून कोट्यवधींची लूट
बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी सायबर गुन्हेगारीसंदर्भातली. गेल्या वर्षभरात सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीसाठी एक नवा फंडा सुरु केलाय. तो म्हणजे डिजिटल अरेस्ट. याच डिजिटल अरेस्टच्या नावाखाली आतापर्यंत राज्यातील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. पोलीस किंवा तपास अधिकारी असल्याचं सांगून हे गुन्हेगार फोन किंवा व्हिडीओ कॉल करतात. आर्थिक गैरव्यवहार, कर चोरी किंवा इतर गुन्ह्यात तक्रार दाखल झाल्यानं तुमच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाल्याचं सांगून घाबरवतात. मग ब्लॅकमेलिंग करत तुमच्याकडून पैसे उकळले जातात. आतापर्यंत अनेक जण सायबर गुन्हेगारांच्या या नव्या चक्रव्यूहात अडकल्याचं समोर आलंय.
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?
कॉल करणारे सायबर गुन्हेगार
सीबीआय एजंट, आयकर अधिकारी
किंवा कस्टम एजंट, ED, NCB किंवा
पोलिस असल्याचं भासवतात
फोन कॉलद्वारे संपर्क करून
ते संबंधित व्यक्तीला व्हॉट्सॲप
किंवा स्काईपसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे
व्हिडिओ कम्युनिकेशनसाठी धमकावतात
आर्थिक गैरव्यवहार, करचोरी किंवा
इतर कायदेशीर उल्लंघनांसारख्या
कारणांचा हवाला देऊन'डिजिटल अरेस्ट'
वॉरंटची धमकी देतात
फसवणूक करणारे पोलिस स्टेशनसारखे
सेटअप तयार करतात जेणेकरून फोन
केलेल्या व्यक्तीला त्यांच्यावर विश्वास बसावा
वॉरंट रद्द करण्यासाठी किंवा
कथित आरोपांमधून सोडवण्यासाठी
पैशांची मागणी केली जाते