Chhagan Bhujbal on Devendra Fadnavis : 10 दिवसांमध्ये तोडगा काढणार, फडणवीसांचं आश्वासन
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज असलेल्या छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.. सागर बंगल्यावर छगन भुजबळ आणि समीर भुजबळांनी मुख्यमंत्र्यांसोबत ४० मिनिटं चर्चा केली,
दरम्यान येत्या १० दिवसांमध्ये तोडगा काढणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचं भुजबळांनी सांगितलंय. दरम्यान साताऱ्यात ३ जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळांची बैठक होणार असल्याची माहिती आहे.
महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांना भेटण्याआधी भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली.. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे..
दरम्यान अजित पवारांनी यावर एका ओळीत उत्तर दिलंय. भुजबळांची नाराजी हा पक्षांतर्गत विषय असल्याचं अजित पवारांनी सांगितंलयय
छगन भुजबळांना डावलण्याचा हेतू नव्हता- फडणवीस
छगन भुजबळांना राष्ट्रीय पातळीवर पाठवण्याचा अजितदादांचा हेतू- फडणवीस
भुजबळांच्या नाराजी बद्दल बोलायचं नाही पण त्यांना मंत्रिपद नाही दिलं ही वस्तुस्थिती असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. संघर्षाचा काळ असो की आनंदाची स्थिती भुजबळ साहेब नेहमीच शरद पवारांसोबत राहिले असं म्हणत सुप्रिया सुळेंनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय.