एक्स्प्लोर

भुजबळांसाठी त्यांचा मुलगा अन् पुतण्या इतकेच ओबीसी, जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही; माणिकराव कोकाटेंचा सडकून प्रहार

Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : भुजबळ-फडणवीस भेटीनंतर माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Group) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर छगन भुजबळ यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. यानंतर आज छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल 40 मिनिटे चर्चा देखील झाली. आता भुजबळ-फडणवीस भेटीनंतर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

माणिकराव कोकाटे म्हणाले की, भुजबळांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली ही चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या मनातलं शल्य बोलून दाखवला असेल आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं असेल, तर मुख्यमंत्री बोलल्याप्रमाणे करतील. मंत्रिमंडळात 42 मंत्र्यांपैकी 17 मंत्री हे ओबीसी तर 16 मंत्री मराठा आहेत. ओबीसींना समान न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही, अशी त्यांची भूमिका असल्याने त्यांचं स्वागत आहे, असे त्यांनी म्हटले.  

भुजबळांसाठी त्यांचा मुलगा अन् पुतण्या इतकेच ओबीसी

ते पुढे म्हणाले की, भुजबळांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना जो निर्णय घ्यायचाय तो ते घेऊ शकतात. भुजबळांना काय वाटतं त्यांच्या मनात काय हे कोण सांगेल? त्यांना ओबीसी म्हणून त्यांचा मुलगा आणि त्यांचा पुतण्या एवढेच दिसत असेल. दुसरे ओबीसी दिसत नसतील तर त्याला काय करणार? चूक असेल तर समजूत काढणार ना. चूकच नसेल तर समजूत कशाची काढणार? भुजबळांना मंत्रिपद न देऊन आमच्या पक्षाची कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाही. आमच्या पक्षाने जो न्याय भुजबळांना दिला तो आतापर्यंत कोणत्याही पक्षाने दिला नाही. राज्यातील गावांमध्ये ओबीसी आणि मराठा बांधव एकत्रितपणे राहतात, काम करतात, एकमेकांवर त्यांचा विश्वास आहे.  समाजा-समाजात तेढ निर्माण करणं हा विचारच मला पटत नाही. जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही. भुजबळ यांना मंत्रिपद मिळावं म्हणून मी मध्यस्थी करणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या बॅनरवरून भुजबळांचा फोटो गायब, थेट कट्टर विरोधक कांदेंची एन्ट्री; कृषीमंत्र्यांची जोरदार चर्चा!

Manikrao Kokate : छगन भुजबळांचा अजितदादांवर थेट हल्लाबोल, माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, 'भुजबळांनी पंतप्रधान...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget