एक्स्प्लोर
लवकरच गायी तामिळ आणि संस्कृत बोलतील: स्वामी नित्यानंद
तामिळ आणि संस्कृत बोलणाऱ्या गायी लवकरच माझ्याकडे असतील, असा दावा स्वामी नित्यानंद यांनी केला आहे.
नवी दिल्ली: लवकरच गायी तामिळ आणि संस्कृत भाषा बोलू शकतील, असा अजब दावा दक्षिण भारतातील स्वयंघोषित संत स्वामी नित्यानंद यांनी केला आहे. सॉफ्टवेअरच्या मदतीनं गायींना तमिळ आणि संस्कृत शिकवणार असल्याचंही स्वामी नित्यानंद यांनी म्हटलं आहे. एकेकाळी सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या स्वामी नित्यानंदच्या या दाव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गायींना तामिळ आणि संस्कृत बोलणं शिकवणार असं या व्हिडीओत स्वामी नित्यानंद म्हणतात.
तामिळ आणि संस्कृत बोलणाऱ्या गायी लवकरच माझ्याकडे असतील, असा दावा स्वामी नित्यानंद यांनी केला आहे.
“माकड आणि गाय यासारख्या जनावरांमध्ये ज्यांच्यात अनेक अवयव नाहीत, जे माणसात आहेत. मात्र अध्यात्मिक प्रक्रियेने असे अवयव त्यांच्यात निर्माण करता येऊ शकतात. तेच मी करणार आहे”, असं नित्यानंद यांनी म्हटलं आहे.
इतकंच नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या ते सिद्धही करु, असा दावाही त्यांनी केला. संबंधित सॉफ्टवेअरची चाचणी केल्यानंतरच मी हा दावा करत आहे. कालच या सॉफ्टवेअरची चाचणी झाली, ते योग्यप्रकारे कामही करत होतं, त्याआधारेच मी आज हा दावा करत आहे, असं नित्यानंद म्हणाले.
माझ्या या दाव्याची नोंद ठेवा. मी वर्षभरात तो सिद्ध करुन दाखवेन. माकड, वाघ आणि सिंहाला बोलतं करण्यासाठी मी स्वरयंत्र तयार करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
नित्यानंद आणि वाद
निद्यानंद हे 2010 मध्ये प्रचंड वादात अडकले होते. एका अभिनेत्रीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या घटनेची कथित सीडीही समोर आली होती. एका टीव्ही चॅनेलने ती प्रसारित केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement