एक्स्प्लोर

दोन दिवसांत परदेशातून येणाऱ्या 39 प्रवाशांना कोरोना, विमान प्रवासासाठी केंद्राच्या नवीन गाईडलाईन्स 

मागील दोन दिवसांत परदेशातून आलेल्या 39 प्रवाशांना कोरोनाची झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून विमान प्रवासासाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे.

India COVID-19 News: चीनसह अनेक देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. दोन दिवसांपासून विमानतळावर प्रवाशांची रॅन्डम कोरोना चाचणी केली जात आहे. मागील दोन दिवसांत परदेशातून आलेल्या 39 प्रवाशांना कोरोनाची झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून विमान प्रवासासाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे.  BF.7 व्हेरियंटमुळे जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भारतामध्येही खबरदारी घेतली जात आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यात येत आहेत. 
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 आणि 27 तारखेला विमानतळावर सहा हजार प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 39 प्रवासी कोरोनाबाधित असल्याचं समोर आले आहे. सर्व प्रवाशांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांचे नमुणे तपासासाठी लॅबमध्ये पाठण्यात आले आहेत. 

कोणत्या देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियमावली -
केंद्र सरकारने जारी केलेल्या गाईडलाईन्समध्ये सहा देशांतून येणाऱ्या प्रवाशांचा समावेश आहे. यामध्ये चीन, जापान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, थायलँड आणि सिंगापूर या देशातून येणाऱ्या फ्लाईट्सचा समावेश आहे. या देशातून येणाऱ्या प्रवाशांना 'एयर सुविधा' गाइडलाइन लागू कऱण्यात येणार आहे. या देशातून येणाऱ्या सर्वा प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.  विमानतळावील सुविधांची चाचपणी करण्यासाठी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया गुरुवार विमानतळावर जाणार आहेत.  

एअर सुविधा गाइडलाइन काय आहे?
दोन वर्षांपूर्वी कोरोनाची एन्ट्री झाल्यानंतर केंद्र सरकारकडून विदेशी प्रवाशांसाठी नियमावली तयार केली होती. यामध्ये एअर सुविधा पोर्टलचा समावेश होता. या पोर्टलमध्ये प्रवाशांना एक फॉर्म भरावा लागतो. त्यामध्ये प्रवासाबाबत माहिती द्यावी लागते. हा फॉर्म भरल्यानंतर प्रवाशांना बोर्डिंग पास देण्यात येतो. 

जानेवारी महिना महत्वाचा-
जगभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतामध्ये परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोनाची रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर भारतासाठी जानेवारी महिना महत्वाचा ठरणार आहे. देशातील सर्वा नागरिकांना कोरोना नियमांचं पालन करण्याची सूचना केंद्राकडून करण्यात आली आहे.  रिपोर्ट्सनुसार, आशियामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यानंतर चाळीस ते 45 दिवसांमध्ये भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात होते. त्यामुळे भारतासाठी पुढील महिना महत्वाचा ठरणार आहे. 

काय आहेत नियमवालीत?
चीन, जापान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, थायलँड आणि सिंगापूर येथून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आरटी पीसीआर चाचणी अनिवार्य आहे. एखादा प्रवाशी पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला विलगीकरणात ठेवलं जाईल. 

एअर सिविधा पोर्टलवर सर्व प्रवाशांना आपली माहिती भरावी लागेल. 

भारतात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची थर्मल स्क्रिनिग होईल. 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget