Coronavirus Cases India: देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली, चोवीस तासात 18 हजार नव्या रुग्णांची भर
देशात सलग सातव्या दिवशी देशात 15 हजाराहून जास्त कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे तर एकूण दोन कोटी 40 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सलग सातव्या दिवशी देशात 15 हजाराहून जास्त कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. गेल्या चोवीस तासात देशात 17,721 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले असून 133 जणांना आपला जीव गमवावा लागला. गेल्या चोवीस तासात 20,652 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. सोमवारी कोरोनाच्या 15,388 रुग्णांची भर पडली होती.
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या आता एक कोटी 12 लाख 62 हजार 707 इतकी झाली आहे. त्यामध्ये एकूण 1,58,063 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकूण एक कोटी नऊ लाख 20 हजार 046 लोक कोरोनावर मात करुन बरे झाले आहेत. देशात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 1 लाख 84 हजार 598 इतकी झाली आहे.
देशात एक मार्च पासून कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतल्याचं दिसून येत आहे. देशात आतापर्यंत दोन कोटी 40 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. रिपोर्टनुसार 2,40,37,644 जणांना वॅक्सीन देण्यात आले आहे.
लसीकरणाच्या 53 व्या दिवशी संध्याकाळी 7 पर्यंत 10 लाख 28 हजार 911 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यापैकी 7 लाख 98 हजार 354 लोकांना पहिल्यांदा लस देण्यात आली. 2 लाख 30 हजार 557 आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्स यांना कोरोनाची लस देण्यात आली. लस घेतलेल्यांपैकी 5 लाख 51 हजार 398 नागरिक हे 60 वर्षापेक्षा जास्त असून 98 हजार 478 हे वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत.
Corona : आनंदवन ठरतंय कोरोनाचं हॉटस्पॉट, बाहेरील लोकांना प्रवेश बंदी