Coronavirus : कोरोनाचा धोका पाहता केंद्र सरकारचा मोठा निर्णय; चीन, जपानसह 'या' देशातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य
India COVID-19 Travel Rules : परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची RT-PCR चाचणी केली जाईल. तसेच चीन, जपान, कोरियामधून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग केले जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.
RT-PCR Mandatory for Arrivals in India : चीनसह जगभरातील कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची RT-PCR चाचणी करण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. तसेच चीन, जपान, कोरिया आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंगही केले जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं असून प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय केले जात आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य असेल. विमानतळावर या प्रवाशांमध्ये कोविड 19 ची लक्षणे आढळल्यास किंवा कोविड चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास प्रवाशांना क्वारंटाईन केलं जाईल.
RT-PCR test to be mandatory for international arrivals from China, Japan, S. Korea, Hong Kong & Thailand. On arrival, if any passenger from these countries is found symptomatic or tests positive for Covid19, then he/she will be put under quarantine: Union Health Min Dr Mandaviya pic.twitter.com/QOXNnu0LRV
— ANI (@ANI) December 24, 2022
देशात कोरोनाचे 3397 सक्रिय रुग्ण
भारतात आज 201 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यासह देशात आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 46 लाखांच्या पार गेली आहे. देशात सध्या 3,397 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी नवीन आकडेवारी जारी केली आहे. तसेच देशात आतापर्यंत पाच लाखांहून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
The Ministry of Health and Family Welfare writes to all States/UTs to ensure a functional and regular supply of medical oxygen for Covid19 pandemic management pic.twitter.com/WFQC8LlqTs
— ANI (@ANI) December 24, 2022
भारतात ओमायक्रॉनच्या BF.7 व्हेरियंटचे चार रुग्ण
जगभरात सध्या कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसत आहे. भारतातही ओमायक्रॉनच्या BF.7 व्हेरियंटचे चार रुग्ण आढल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. काही राज्यांनी मास्कसक्ती लागू केली आहे.