एक्स्प्लोर

Covid-19 Cases LIVE : कोरोनामुळे चिंता वाढली! परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य; कोरोना संदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

Coronavirus LIVE Updates : जगात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे. भारतातही प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून खबरदारी घेतली जात आहे. या संदर्भातील प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या.

LIVE

Key Events
Covid-19 Cases LIVE : कोरोनामुळे चिंता वाढली! परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य; कोरोना संदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

Background

Coronavirus Updates in India : जगभरात कोरोना विषाणूचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट आणि त्याचे सब व्हेरियंट BF.7 आणि BF.12 यांचा संसर्ग वेगाने पसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतातही ओमायक्रॉनचे चार रुग्ण आढळल्याने चिंतेचं वातावरण आहे. जगभरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता प्रशासन हाय अलर्टवर आहे. केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाकडून सर्तकतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचं जीनोम सिक्वेंसिंग करण्याचं आवाहन केंद्राने राज्यांना केलं आहे. विमानतळावर परदेशी प्रवाशांची चाचणी आणि सॅम्पलिंसग केलं जात आहे. कोविड-19 (Covid-19) च्या सध्याच्या परिस्थितीवर नॅशनल टास्क फोर्स प्रमुख आणि नीति आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी सांगितलं आहे की, भारतीयांना घाबरण्याचं काही कारण नाही, सरकारकडून योग्य खबरदारीचे उपाय केले जात आहेत.

वाढत्या प्रादुर्भावानंतर केंद्र सरकार सतर्क झालं आहे.  देशातील सर्व राज्यांनी सतर्क राहिलं पाहिजे, आरोग्य व्यवस्थापनेसंबंधित सर्व तयारी केली पाहिजे असे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी दिल्यानंतर ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोव्हिड नियमांचे पालन करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहित केल्या आहेत. 

केंद्राकडून आलेली नियमावली पाळण्याच्या सूचना देखील केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिल्या आहेत. इन्फ्ल्यूएन्झा आणि सारीच्या गंभीर केसेसची देखील कोव्हिड चाचणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  चाचणी किट मुबलक प्रमाणात मुबलक आहेत की नाही याची काळजी घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या सचिवांना देखील हे पत्र मिळालं असून आता सणासुदीच्या दिवसांत सतर्क राहण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य खात्याकडून करण्यात आलं आहे. 

महाराष्ट्रात कोविड परिस्थिती नियंत्रणात

 जगातील कोरोनाच्या (Corona Cases Update) उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड अनुरूप वर्तन पंचसुत्रीचे काटेकोर पालन होईल, हे पाहण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज दिले. 

बूस्टर डोस घेण्याचं आवाहन

कोरोनाने पुन्हा चीनसह जगभरातील अनेक देशांमध्ये खळबळ उडाली आहे. इटली, अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्राझील या देशांमध्ये कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक नवीन अॅडव्हायजरी जारी केली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच मास्क घालण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच ज्या नागरिकांनी आतापर्यंत बूस्टर डोस घेतलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर डोस घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.

13:22 PM (IST)  •  24 Dec 2022

Rules for International Travellers  : चीन, जपानसह 'या' देशातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR अनिवार्य

India COVID-19 Travel Rules : परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची RT-PCR चाचणी केली जाईल. तसेच चीन, जपान, कोरियामधून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग केले जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. मांडविया यांनी सांगितलं की, 'चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य असेल. विमानतळावर या प्रवाशांमध्ये कोविड 19 ची लक्षणे आढळल्यास किंवा कोविड चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास प्रवाशांना क्वारंटाईन केलं जाईल.'

12:24 PM (IST)  •  24 Dec 2022

Coronavirus Cases in India : 10 दिवसांत दोन हजारांहून कमी कोरोना रुग्ण

Coronavirus Cases in India : देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 4,46,76,515 झाली आहे. तसेच, 21 डिसेंबर रोजी कोरोनाचे नवीन 131 रुग्ण आढळले आणि तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना चाचणीत लक्षणीय घट झाल्याचं दिसून येत आहे. 22 डिसेंबर रोजी देशात कोरोना विषाणूचे 185 रुग्ण आढळले होते. त्यानंतर 

12:16 PM (IST)  •  24 Dec 2022

Corona Death in India : देशात एकूण 5 लाख 30 हजार 691 रुग्णांचा मृत्यू

Coronavirus Cases in India : आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. केरळमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आजपर्यंत भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 30 हजार 691 आहे. देशातील दैनंदिन रुग्ण सकारात्मकतेचे प्रमाण 0.15 टक्के आणि साप्ताहिक रुग्ण सकारात्मकता दर 0.14 टक्के आहे.

12:00 PM (IST)  •  24 Dec 2022

Coronavirus : भारतात आठवडाभरात कोरोनाचे 1,200 पेक्षा कमी रुग्ण

Corona Cases in India : जुलै महिन्यापासून देशात कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले होते. आठवडाभरात कोरोनाचे 1,200 पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात 14 ते 23 डिसेंबरपर्यंत म्हणजेच 10 दिवसांत कोरोनाचे 1,566 रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात एकूण 3,397 सक्रिय प्रकरणे आहेत.

11:46 AM (IST)  •  24 Dec 2022

Corona Death in India : देशात एकूण 5 लाख 30 हजार 691 रुग्णांचा मृत्यू

Coronavirus Cases in India : आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. केरळमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आजपर्यंत भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 30 हजार 691 आहे. देशातील दैनंदिन रुग्ण सकारात्मकतेचे प्रमाण 0.15 टक्के आणि साप्ताहिक रुग्ण सकारात्मकता दर 0.14 टक्के आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखलDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Embed widget