Coronavirus In India : देशात कोरोनाचे 3397 सक्रिय रुग्ण, मृत्यू किती? भारतातील कोरोनाची परिस्थिती
Covid 19 in India : देशात सध्या 3,397 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी नवीन आकडेवारी जारी केली आहे.
Covid 19 Cases in India : जगभरात पुन्हा एकदा कोरोनाची लाट (Coronavirus) पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार (Central Government) आणि राज्य सरकार (State Government) अलर्टवर असून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या 24 तासांत म्हणजे देशात 201 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशात आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 46 लाखांच्या पार गेली आहे. देशात सध्या 3,397 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी नवीन आकडेवारी जारी केली आहे.
प्रशासनाकडून तयारी, मार्गदर्शक सूचना जारी
जगभरात सध्या कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. भारतातही ओमायक्रॉनच्या BF.7 व्हेरियंटचे चार रुग्ण आढल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. काही राज्यांनी मास्कसक्ती लागू केली आहे. देशात शुक्रवारी देशात कोरोनाचे 163 नवीन रुग्ण आढळले होते तर, कोरोनामुळे गेल्या 24 तासात 6 जणांना आपला जीव गमवावा लागला असून, त्यानंतर एकूण मृतांचा आकडा आता 5 लाख 30 हजार 690 वर पोहोचला आहे.
देशात एकूण 5 लाख 30 हजार 691 रुग्णांचा मृत्यू
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. केरळमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आजपर्यंत भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 30 हजार 691 आहे. देशातील दैनंदिन रुग्ण सकारात्मकतेचे प्रमाण 0.15 टक्के आणि साप्ताहिक रुग्ण सकारात्मकता दर 0.14 टक्के आहे.
10 दिवसांत दोन हजारांहून कमी कोरोना रुग्ण
यापूर्वी 22 डिसेंबर रोजी देशात कोरोना विषाणूचे 185 रुग्ण आढळले होते. त्यानंतर देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 4,46,76,515 झाली आहे. तसेच, 21 डिसेंबर रोजी कोरोनाचे नवीन 131 रुग्ण आढळले आणि तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना चाचणीत लक्षणीय घट झाल्याचं दिसून येत आहे.
भारतात कोरोनाचा संसर्ग कमी
जुलै महिन्यापासून देशात कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले होते. आठवडाभरात कोरोनाचे 1,200 पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात 14 ते 23 डिसेंबरपर्यंत म्हणजेच 10 दिवसांत कोरोनाचे 1,566 रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात एकूण 3,397 सक्रिय प्रकरणे आहेत.