Covid 22 : नवीन सुपर व्हेरिएंट 'कोविड 22' हा डेल्टापेक्षाही अधिक धोकादायक; तज्ज्ञांचा इशारा
Coronavirus : तज्ज्ञांनी कोरोनाच्या 'कोविड 22' या नवीन सुपर व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली असून त्याची तीव्रता ही डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक असल्याचं सांगितलंय.
नवी दिल्ली : कोरोनाच्या एका नव्या 'सुपर व्हेरिएंट' चा प्रादुर्भाव पुढच्या वर्षी वाढणार असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. हा व्हेरिएंट सध्याच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक धोकादायक असून ज्यांचे लसीकरण झालेले नाही असे लोक याचे सुपर स्प्रेडर्स बनण्याची शक्यता आहे असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.
अद्यापही भारतात 12 वर्षांच्या आतील बालकांचे लसीकरण करण्यात आलं नाही. त्यामुळे येत्या काळात हा वयोगट कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा सुपर स्प्रेडर्स ठरु शकेल अशीही भीती व्यक्त केली जात आहे.
झ्युरिक मधील संसर्गतज्ज्ञ असलेले प्रो. साई रेड्डी म्हणतात की, "सध्याच्या डेल्टा प्लस आणि इतर कोरोनाच्या स्ट्रेन्स पासून एक नवीन आणि अधिक धोकादायक व्हेरिएंट निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने देशात आणि जगभरात मोठा प्रादुर्भाव पसरवला. त्यामुळे अनेक देशांतील परिस्थिती अत्यंत बिकट बनली होती. नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव हा त्यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात केवळ एकदाच कोरोनाची लस घेऊन उपयोग होणार नाही तर अधिक लसी घ्याव्या लागतील. एकापेक्षा अधिक लसीच या नवीन व्हेरिएंटची शक्ती कमी करु शकतील आणि त्याच्या प्रादुर्भावाविरोधात लढा देऊ शकतील."
कोरोनाच्या भविष्यातील नविन व्हेरिएंटशी लढायचं असेल तर आपल्याला केवळ एकाच लसीवर अवलंबून राहून चालणार नाही. एकापेक्षा अधिक लसी आणि त्याही पलिकडे जाऊन इतर मार्गही शोधावे लागतील असंही प्रो. साई रेड्डी यांनी स्प्ष्ट केलं.
सुपर स्प्रेडर्स म्हणजे काय?
सुपर स्प्रेडर्स असे लोक असतात जे कोरोनाचा संसर्ग हा अधिक वेगाने आणि तुलनेने अधिक लोकांमध्ये पसरवतात. म्हणजे एखादा बाधित व्यक्ती जर इतर दोघांमध्ये कोरोनाचा प्रसार करत असेल तर सुपर स्प्रेडर्स हा तुलनेने दहापेक्षाही अधिक लोकांमध्ये त्याचा प्रसार करत असतो. त्यामुळे सामूहिक संसर्गाची भीती निर्माण होण्याची शक्यता असते.
महत्वाच्या बातम्या :
- Coronavirus Vaccine News: देशातील पहिली mRNA बेस्ड वॅक्सिन सुरक्षित, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी DCGI ची मंजुरी
- Covid Vaccine : देशातील 1.6 कोटी लोकांना वेळेत दुसरा डोस नाही, ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक
- Covid 19 3rd Wave : ऑक्टोबरमध्ये कोरोनाचा कहर? बालकांना अधिक धोका, पुरेशी तयारीही नाही- गृह मंत्रालयाचा अहवाल