एक्स्प्लोर

Coronavirus | देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 हजार पार; आतापर्यंत 273 लोकांचा मृत्यू

देशभरातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाची बाधा झालेल्या रूग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण देश हतबल झाला आहे. लॉकडाऊन असूनही कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 8447 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 273 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 7409 कोरोना बाधित आहेत. तर 764 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील 24 तासात कोरोनाबाबत समोर आलेली सर्व माहिती पत्रकार परिषदेत सादर केली. गेल्या 24 तासात देशभरात 34 रुग्णांचा बळी कोरोनाने घेतलाय. कोरोना व्हायरसमुळे देशात आतापर्यंत 273 रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि 8356 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर जगभरात एक लाखाहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित संक्रमित रुग्णांची जगातील संख्या 16लाखांहून अधिक आहे. चीन, इटली, अमेरिका आणि स्पेनमध्ये कोरोनाचा सर्वाधित प्रभाव आहे.

पाहा व्हिडीओ : महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1981वर

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितल्यानुसार, 'गेल्या 24 तासांत 909 नवीन कोरोना बाधितांची भर पडली आहे. तर आतापर्यंत 273 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात 80 टक्के रूग्ण कमी लक्षणं असणारे आहेत. मागील 24 तासांमध्ये 34 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 20 टक्के रूग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. लव अग्रवाल यांनी सांगितले की, 9 एप्रिलच्या आकडेवारीनुसार, जर 1100 बेडची आवश्यकता होती, तर आता 85,000 बेड्स उपलब्ध होते. सध्या 1671 बेड्सची आवश्यकता आहे. तर 601 कोरोना बाधितांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या रूग्णालयांमध्ये 1 लाख 5 बेड्स उपलब्ध आहेत.'

आपला प्रयत्न सुरुवातीपासून अॅडव्हान्स अॅक्शनवर आहे, तयारीच्या बाबतीतही प्रशासन या व्हायरसपेक्षा एक पाऊल पुढे आहे. तुम्हा सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. देश पूर्णपणे लढण्यासाठी तयार आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी म्हटलं. या लढ्यात सरकार आणि प्रायव्हेट सेक्टरही समाविष्ट आहे. यात सर्वात मोठी भूमिका सामान्य जनतेची आहे, त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावी आणि या परिस्थितीला गंभीररित्या घ्यावं असं आवाहन लव अग्रवाल यांनी केलं.

24 तासात 34 कोरोना बाधितांचा मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 24 तासातील कोरोनाबाधितांचे आकडे सादर केले, मंत्रालयाच्या अहवालानुसार आतापर्यंत कोरोनाच्या 8356 पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत. कालपासून आतापर्यंत 909 नवी प्रकरणं समोर आली आहेत आणि मृतांचा आकडा 273वर पोहोचलाय. केवळ 24 तासात कोरोनाने भारतात 34 बळी घेतलेत. कोरोनाचे निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या 716 रुग्णांना घरी पाठवण्यात आलंय, त्यामुळे हे 716जण कोरोनापासून पूर्णपणे बरे झाले आहेत हीच आनंदाची बातमी आहे, असं लव अग्रवाल यांनी म्हटलं. तर कालपासून 74 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

पाहा व्हिडीओ : कोरोनाचा ग्राऊंड रिपोर्ट, सांगली, लातूर, वाशिम, यवतमाळ, अमरावती, परभणी, हिंगोली, सांगली, चंद्रपूर, पालघर

कोणत्या राज्यात किती मृत्यू?

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये 127, मध्य प्रदेशात 36, गुजरातमध्ये 22, पंजाबमध्ये 11, दिल्लीमध्ये 19, तामिळनाडूमध्ये 10, तेलंगणामध्ये 9, आंध्रप्रदेशमध्ये 6, कर्नाटकात 6, पश्चिम बंगालमध्ये 5, जम्मू-काश्मिरमध्ये 4, उत्तर प्रदेशमध्ये 5, हरियाणामध्ये 3, राजस्थानमध्ये 3, केरळमध्ये 2, बिहार झारखंड, हिमाचल प्रदेश आणि ओडिशामध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

कोरोना टेस्टिंग वाढवण्यावर लक्ष - केंद्रीय आरोग्य मंत्रालय

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं सध्या कोरोनाच्या टेस्टमध्ये वाढ करण्यावर लक्ष आहे. टेस्टिंगकरिता देशभरातील 14 संस्था नेमल्या गेल्या आहेत. टेस्टिंगच्या मदतीने आणखी कोरोनाची प्रकणं समोर येण्यास त्वरित मदत होईल. कोरोनाची 80 टक्के प्रकरणं कोविड केअर सेंटरमध्ये तपासली जातात, या व्यतिरिक्त काहींची तपासणी कोविड हेल्थकेअर सेंटरमध्ये केली जाते. क्रिटिकल केसेस कोविड हॉस्पिटलमध्ये तपासली जातात जिथे व्हेंटिलेटर आणि आयसीयूची सुविधा असते. असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातम्या : 

PM Cares Fund | फक्त पंतप्रधान निधीला केलेली मदतच सीएसआर म्हणून ग्राह्य

PM Cares Fund सुरु करुन पंतप्रधान मोदींनी सेल्फ प्रमोशनची संधी सोडली नाही : पृथ्वीराज चव्हाण

कोरोना संकटाशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आखली रणनीती; सर्व राज्यांना सूचना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Citizens Residing Illegally In US : ट्र्रम्प सरकार 18 हजार अवैध भारतीयांना हद्दपार करणार; व्यापार युद्धाच्या भीतीने केंद्र सरकारचा सुद्धा मोठा निर्णय!
ट्र्रम्प सरकार 18 हजार अवैध भारतीयांना हद्दपार करणार; व्यापार युद्धाच्या भीतीने केंद्र सरकारचा सुद्धा मोठा निर्णय!
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore: 'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
Virginity Test on Honeymoon : 'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uday Samant on Shivsena : एकनाथ शिंदे पु्न्हा ठाकरेंना धक्का देणार? उदय सामंतांचा सर्वात मोठा दावाWalmik Kard Wife Property : बीडच्या मांजरसुंबा इथे कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे 9 एकर जमीनABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 22 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सTop 80 at 8AM 22 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Citizens Residing Illegally In US : ट्र्रम्प सरकार 18 हजार अवैध भारतीयांना हद्दपार करणार; व्यापार युद्धाच्या भीतीने केंद्र सरकारचा सुद्धा मोठा निर्णय!
ट्र्रम्प सरकार 18 हजार अवैध भारतीयांना हद्दपार करणार; व्यापार युद्धाच्या भीतीने केंद्र सरकारचा सुद्धा मोठा निर्णय!
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore: 'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
Virginity Test on Honeymoon : 'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy : खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
Bengaluru Crime: बंगळुरुच्या के आर मार्केटमध्ये धक्कादायक घटना, बसची वाट पाहणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार, दोघांना अटक
बसची वाट पाहणाऱ्या महिलेला फसवून आडोशाला नेलं, अंधार सामूहिक अत्याचार, बंगळुरु हादरलं
Radhakrishna Vikhe Patil: काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
Justice Krishna S Dixit on Constitution : कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
Embed widget