कोरोना संकटाशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आखली रणनीती; सर्व राज्यांना सूचना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान मोदी यांनी आश्वस्त केलं. सोबतच आगामी काळात राबण्यात येणाऱ्या रणनीतीची माहिती दिली.
![कोरोना संकटाशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आखली रणनीती; सर्व राज्यांना सूचना PM Modi strategy to fight against Corona crisis कोरोना संकटाशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आखली रणनीती; सर्व राज्यांना सूचना](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/12014658/WhatsApp-Image-2020-03-24-at-8.10.07-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : कोरोना संकाटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना संदर्भात रणनीती तयार करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांशी असलेला हा तिसरा संवाद आहे, पूर्वीची बैठक 2 एप्रिल आणि 20 मार्च 2020 रोजी झाली होती. राज्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कोविड 19 चा परिणाम कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र, परिस्थिती वेगाने बदलत असल्याने सर्वांनी सावध राहण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी आतापर्यंत घेतलेल्या उपायांचा काय परिणाम होतो, यासाठी प्रत्येक आठवड्यात अशी आढावा बैठक घेतली जाणार आहे.
देशात आवश्यक औषधांचा पुरेसा पुरवठा आहे असून सर्व आघाडीच्या कामगारांना संरक्षणात्मक उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना केली जात आहे. तसेच काळा बाजार आणि साठेबाजी कठोर विरूध्द कठोर कारवाई करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या.
डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्यांवर हल्ल्याचा निषेध पंतप्रधानानी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्यांवर हल्ल्याची घटना निषेध केला. उत्तर-पूर्व राज्य आणि काश्मीरमधील विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याच्या घटनांवर पंतप्रधानांनी अधोरेखित केल्या. अशा प्रकरणांवर कठोरपणे निपटून घेण्याची गरज आहे. लॉकडाऊन उल्लंघन रोखण्याची गरज आहे आणि सामाजिक अंतर पाळले जाईल याचीही काळजी घेतली. लॉकडाऊनमधून एक्झिट प्लॅनबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, लॉकडाऊनच्या कामकाजावर आणखी दोन आठवड्यांचा कालावधी वाढविण्याबाबत राज्यांमध्ये एकमत असल्याचे दिसते. आधी सरकारचे ब्रीदवाक्य ‘जन है तो जान है’ हे होते पण आता ते ‘जान भी जहान भी’ असे त्यांनी अधोरेखित केले.
महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
आरोग्य सेतू अॅप पंतप्रधान हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी आणि दूरध्वनीद्वारे रुग्णांपर्यंत पोहोचवण्याविषयी बोलले. मंडईंमध्ये होणारी गर्दी रोखण्यासाठी शेतीच्या उत्पादनांसाठी थेट विपणनास चालना दिली जाऊ शकते, यासाठी एपीएमसीच्या मॉडेलच्या मॉडेलमध्ये त्वरेने सुधारणा करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. पंतप्रधानांनी आरोग्य सेतू अॅप लोकप्रिय करण्याचेही सांगितले. दक्षिण कोरिया आणि सिंगापूर यांना संपर्क साधण्यात यश कसे मिळाले याचा त्यांनी नमूद केला. त्या अनुभवांच्या आधारे, अॅपच्या माध्यमातून भारताने स्वत:चे प्रयत्न केले आहेत, जे साथीच्या आजाराविरुद्धच्या लढ्यात एक आवश्यक साधन ठरेल. त्यांनी अॅपचा ई-पास असा वापर करण्याचे सूचवले. ज्यामुळे नंतर एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्याची सुविधा मिळू शकेल. आर्थिक आव्हानांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, संकट हे स्वावलंबी होण्याची आणि देशाला आर्थिक संधी बनविण्याची संधी आहे.
महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
सोशल डिस्टन्सिंग पाळा मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यातील कोविड पॉझिटिव्ह घटनांबद्दल, सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी, आरोग्याच्या सुविधांच्या पायाभूत सुविधांची उभारणी, स्थलांतरितांच्या अडचणी कमी करणे आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा राखण्यासाठी केलेली पावले याविषयी मते व्ययक्त केली. लॉकडाऊनला दोन आठवड्यांपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री, संरक्षणमंत्री, आरोग्यमंत्री, प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव आणि भारत सरकारच्या इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Health Minister on #Lockdown | लॉकडाऊन गांभीर्याने घेतला नाही तर 30 एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)