Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 6 हजार 358 नवे रुग्ण; ओमायक्रॉनबाधितांचा आकडा 653 वर
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 6 हजार 358 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 293 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यासोबतच कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं देशाची चिंता वाढवली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 6 हजार 358 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 293 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 653 रुग्ण आढळून आले आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची सद्यस्थिती...
आतापर्यंत 4 लाख 80 हजार 290 रुग्ण मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 75 हजार 456 आहे. या महामारीमध्ये जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 4 लाख 80 हजार 290 वर पोहोचली आहे. तर काल (सोमवारी) 64501 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यानंतर आतापर्यंत एकूण 3 कोटी 42 लाख 43 हजार 945 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात सोमवारी 1426 नव्या कोरोनाबाधितांची भर, तर 21 जणांचा मृत्यू
कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1426 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 776 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील दोन- तीन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. त्यातच नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढवण्याची शक्यता आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 3 हजार 733 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.66 टक्के आहे.
राज्यात काल (सोमवारी) 26 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात काल 26 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 167 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 72 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात सोमवारी 21 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात काल (सोमवारी) 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 10 हजार 441 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 91 हजार 464 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 880 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 85 , 49, 133 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- COVID-19 Vaccine : 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण; असा बुक करा स्लॉट
- लसीच्या बुस्टर डोसने कोरोनाचा प्रसार थांबेल? सरकारच्या निर्णयावर तज्ञांकडून प्रश्न उपस्थित
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा