Coronavirus Cases Today : भारतात 3207 कोरोनाचे नवीन रुग्ण वाढले, 29 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत 3207 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग काहीसा घटताना दिसत आहे. देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 3207 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढलेल्या रुग्णांमधील सर्वाधिक रुग्ण वाढ देशाची राजधानी दिल्लीमध्ये झाली आहे. दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत हजारहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत.
राजधानी दिल्लीत 1422 नवे रुग्ण
दिल्ली राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राजधानी दिल्लीमध्ये रविवारी दिवसभरात 1422 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. दरम्यान दिवसभरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. दिल्लीतील दैनंदिन कोरोना रुग्ण सकारात्मकता दर 5.34 टक्क्यावर पोहोचला आहे. तर देशातील दैनंदिन कोरोना रुग्ण सकारात्मकता दर 0.05 नोंदवला गेला आहे.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) May 9, 2022
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/Tup5uP1hLj pic.twitter.com/oPzMLPdHnY
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 403
देशातील नव्या रुग्णांसह सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 403 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी दिवसभरात 3 हजार 410 रुग्णांनी कोरोना विषाणू संसर्गावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत देशात 29 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5 लाख 24 हजार 93 इतकी झाली आहे.
देशांतर्गत लसीकरणात 190 कोटीहून अधिक लसी देण्यात आल्या
रविवारी दिवसभरात देशव्यापी लसीकरणात 13 लाख 50 हजार 622 लसी देण्यात आल्या. देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आलं असून आतापर्यंत 190 कोटी 34 लाख 90 हजार 396 लसी देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या