(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Cases India : देशातील कोरोनाचा आलेख घसरतोय, गेल्या 24 तासात 2.81 लाख नव्या रुग्णांची भर तर 4,106 रुग्णांचा मृत्यू
Coronavirus in India : गेल्या 24 तासात देशात 3.78 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी येत असली तरी मृतांची संख्या काही कमी येताना दिसत नाही.
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये काही प्रमाणात कमी आली असली तरी अद्याप परिस्थिती चिंताजनक आहे गेल्या 24 तासात देशात दोन लाख 81 हजार 386 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून तीन लाख 78 हजार 741 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासात देशात चार हजार 106 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे.
देशातील आजची कोरोना स्थिती :
- एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 49 लाख 65 हजार 463
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 11 लाख 74 हजार 390
- एकूण सक्रिय रुग्ण : 35 लाख 16 हजार 997
- कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 74 हजार 390
भारतात आतापर्यंत 18 कोटी 29 लाख 26 हजार 460 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर आतापर्यंत 31 कोटी 64 लाख 23 हजार 658 लोकांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातली स्थिती
राज्यात लॉकडाऊनचा परिणाम आता दिसायला लागला असून दिवसेंदिवस कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. राज्यात रविवारी नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.रविवारी तब्बल 59 हजार 318 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे तर नवीन 34 हजार 389 कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान 974 कोरोना रुग्णांची मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आजपर्यंत राज्यातील 48,26,371 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 4 लाख 68 हजार 109 सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रुप धारण केलं आहे. त्यामुळे ही लढाई आता मोठी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता फॅमिली डॉक्टरांना आवाहन केले आहे. कोविड विरुध्दची लढाई लढण्यासाठी "माझा डॉक्टर" म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या फॅमिली डॉक्टरांनी शासनासोबत यावे, कुटुंब प्रमुख म्हणून मी आज आपल्याला साद घालत आहे. या डॉक्टरांनी गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या उपचाराचे शिवधनुष्य उचलावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :