Corona Vaccine : देशात 13 कंपन्यांना कोरोना लस बनवण्याची परवानगी देण्यात आली, जेपी नड्डा यांची माहिती
जे लोक आज लसीबाबत थट्टा करत आहेत, जेव्हा पंतप्रधान भारतातील उद्योजकांना लस बनवण्यास प्रोत्साहित करत होते, त्यावेळी विरोधी पक्षांनी भारताचे मनोबल सर्व प्रकारे खच्चीकरण करण्याचे काम केले, असं जेपी नड्डा यांनी म्हटलं.
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारची 7 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्तच्या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिल्लीत कोविड मदत सामग्रीस हिरवा झेंडा दाखवला. यानंतर त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं. या दरम्यान त्यांनी विरोधकांनाही लक्ष्य केले. तसेच 13 कंपन्यांना कोरोना लस बनवण्यास परवानगी दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
जेपी नड्डा म्हणाले की, जे लोक आज लसीबाबत थट्टा करत आहेत, जेव्हा पंतप्रधान भारतातील उद्योजकांना लस बनवण्यास प्रोत्साहित करत होते, त्यावेळी विरोधी पक्षांनी भारताचे मनोबल सर्व प्रकारे खच्चीकरण करण्याचे काम केले. सुरुवातीला 2 ते आता 13 कंपन्यांना लस बनवण्याची परवानगी देण्यात आली आहे. काही दिवसांनंतर 19 कंपन्या कोरोनाची लस बनवण्यास सुरवात करतील. आता कोविड लसींच्या उपलब्धतेवर ओरडणाऱ्या लोकांना या लसीबद्दल पूर्वी शंका होती, असं जेपी नड्डा यांनी म्हटलं.
भाजप कार्यकर्ते लोकांमध्ये जाऊन मदत करत आहेत
जेपी नड्डा म्हणाले की, भाजप कार्यकर्ते कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये जाऊन मदत करत आहेत. तर विरोधी पक्ष आयसोलेशनमध्ये गेला आहे. कोविड दरम्यान भाजपचे कार्यकर्ते जनतेसोबत उभे आहेत, तर विरोधी नेते फक्त डिजिटल कॉन्फरन्समध्ये हजेरी लावत आहेत, असं जेपी नड्डी यांनी म्हटलं आहे .